बदनापूर, जि. जालना : ‘‘हवामान बदलाचे जैवविविधतेवर बरे वाईट परिणाम होत असतात. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेची वृद्धी अवलंबून असणाऱ्या शेती क्षेत्रावर हे दुष्परिणाम अधिक ठळकपणे दिसून येत आहेत. त्यामुळे या समस्येकडे संशोधकांसोबतच शेतकरी वर्गाने देखील डोळसपणे पाहण्याची गरज आहे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांनी व्यक्त केले.
बदनापूर कृषी विज्ञान केंद्राद्वारे आयोजित दुसऱ्या वैज्ञानिक सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी (ता.१२) कुलगुरू डॉ. ढवण यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्रात झाली. केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सोमवंशी यांनी वर्ष २०२० मधील केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला.
प्रगतिशील शेतकरी संजय मोरे पाटील यांनी शेतकऱ्यांना सध्या पावेतो शेतमाल विपणना संदर्भात येणाऱ्या अडचणी बाबत विवेचन करून सर्व कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांनी याबाबत विशेष प्रयत्न करण्याची माफक अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
विद्यापीठाने विविध पिकांचे वाण प्रसारित केले आहेत. पिकांच्या लागवड पद्धती, कोरडवाहू शेती पद्धती तंत्रज्ञान, पाणी, कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत अनेक संशोधन शिफारशी दिल्या आहेत. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे मत मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी केले.
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. एस. बी. पवार, बदनापूरच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एम. वाघमारे, डॉ. डी. के. पाटील, डॉ. संजय पाटील सोयगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, तालुका कृषी अधिकारी व्ही.एस. ठक्के आदी उपस्थित होते.