चंद्रपूर : रब्बी हंगामातील पीककर्जाच्या वितरणाची टक्केवारी यंदा देखील घसरली आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात १५ कोटींपेक्षा जास्त पीककर्जाचे वाटप झाले होते. या वर्षी मात्र पीककर्ज अवघे ९ कोटींपर्यंतच झाले आहे.
हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळाल्यास त्यांना हंगामाचे नियोजन करणे शक्य होते. मात्र या वेळी कोरोनामुळे शेती व्यवस्थापनात देखील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक शेतकऱ्यांची शेती पडीक राहिली. परिणामी, हंगामात पीककर्जाची टक्केवारी घसरल्याचे सांगितले जाते.
गेल्या वर्षी खरीप हंगामात बॅंकांनी पीककर्ज वितरणाची प्रक्रिया हंगामाच्या दोन महिने आधीच सुरू केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील कर्ज प्रकरणातील त्रुटी दूर करता आल्या आणि सुलभरीत्या कर्जाची उपलब्धता झाली. यंदा मात्र तशाप्रकारचे धोरण राबविण्यात न आल्याने पीककर्जाची टक्केवारी घसरली आहे.
कडधान्य क्षेत्र वाढले
यंदा राजुरा, गोंडपिपरी, पोंभूर्णा, कोरपना, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, सावली, मूल तालुक्यांत कडधान्य लागवडीचे हेक्टरी प्रमाण वाढीस लागले आहे. ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर, सिंदेवाही हे तालुके भात उत्पादक आहेत.
१२० कोटींचे उद्दिष्ट
कोरोनामुळे पीककर्ज मेळावे प्रशासनाला घेता आले नाही, असा दावा केला जात आहे. त्यामुळेच पीककर्ज गेल्या वर्षीच्या १५ कोटींवरून ९ कोटींपर्यंत खाली आल्याचे सांगितले जाते. जिल्ह्याचे पीककर्जाचे उद्दिष्ट १२० कोटी रुपयांचे आहे.

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.