कोल्हापूर : येथे आयोजित द्राक्ष महोत्सवात सुमारे २१ लाखांवर विक्री झाली असल्याची माहिती महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली.
महोत्सवात सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव, पलूस व जत तालुक्यांतील एकूण १८ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूर द्राक्ष महोत्सवात ३०.१०५ मेट्रिक टन द्राक्षांची विक्री करण्यात आली. द्राक्ष उत्पादकांना सरासरी प्रती किलो ६० रुपये दर मिळाला. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष विक्रीतून रक्कम १८ लाख मिळाले आहेत.
कोल्हापूर द्राक्ष महोत्सवामध्ये एक टन बेदाण्याची विक्री झाली असून, द्राक्ष उत्पादकांना सरासरी प्रती किलो २६० रुपये दर मिळाला. बेदाणा विक्रीपोटी द्राक्ष उत्पादकांना अंदाजे रुपये २ लाख ७३ हजार रुपये मिळाले. महोत्सवात एकूण २० लाख ७३ हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. महोत्सवात अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
दरम्यान, कोल्हापूर विभागामध्ये मे २०२१ मध्ये हापूस व केसर आंबा उत्पादकांसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, पणजी (गोवा) व बेळगाव येथे आंबा महोत्सव २०२१ चे आयोजन प्रस्तावित असल्याचे उपसरव्यवस्थापक श्री. घुले यांनी सांगितले.

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.