सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत मंगळवारी (ता. ६) सायंकाळी उशिरा वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. आंबोली (ता. सावंतवाडी) परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांची चांगलीच तारांबळ उडाली.
जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. दरम्यान, सायकांळी उशिरा आंबोली परिसरात विजांच्या कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या पावसाने आंबोली परिसराला झोडपून काढले. त्यामुळे सर्वांची धांदल उडाली.
आंबोली पाठोपाठ सावंतवाडी तालुक्यातील माजगाव, माडखोल व इतर ग्रामीण भागात देखील मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. कुडाळ, दोडामार्ग तालुक्यांच्या काही भागांत तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांचे तोंडचे पाणी पळाले.
सध्या या परिसरातील आंबा परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे. तर काजू हंगाम ऐन रंगात आला आहे. झाडाखाली मोठ्या प्रमाणात काजू पडलेल्या आहेत. पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यावर डाग पडण्याची शक्यता असल्याने आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, आज सकाळी देखील जिल्ह्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून, वातावरणातही उष्म्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आजदेखील पाऊस पडेल अशी भीती बागायतदारांच्या मनात आहे.

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.