सोलापूर ः सोलापूर शहर जिल्हयात सध्या उष्ष्णतेची लाट आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे उष्णतेच्या लाटेमुळे दुपारच्या वेळी सोलापूर शहरातील रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत आहे.
दिवसाच्या कमाल तापमानात गेलया आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. सध्या सोलापूर येथील तापमान ४० अंश सेल्सिअसपक्षा अधिक असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे दुपारीच्या वेळेस रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात बदल झालेला दिसून येत आहे.
सकाळच्या सत्रात अचानक ढग येत आहेत. त्यामुळे उकाडा जाणवत आहे. निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाच्या स्थितमुळे तापमानात मागील आठवड्यात मोठी वाढ झाली होती. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेला होता. दुपारच्या वेळेस जास्त उन्हाच्या झळा राहत असल्याने, अनेक जण सकाळी सत्रातच काम आटोपून घेत असताना दिसून येत आहेत.
वाढत्या तापमानामुळे सोलापूर शहरातील विहीरीत पोहण्यासाठी मुलांची गर्दी होताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने अनेक नागरिक आता दुपारच्या वेळेत घराच्या बाहेर पडत नाहीत. दोन दिवसानंतर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, यामध्ये आणखी वाढ होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.


आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.