ठिबक सिंचन साठी सरसकट ८०% सबसिडी नवीन GR आला, मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेची राज्यातील उर्वरित १०७ तालुक्यांमध्ये अंमलबजावणी करण्याबाबत एक नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. ज्या अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट 80% अनुदान देण्यात येईल.. subsidy-for-drip-irrigation
प्रस्तावना:
संदर्भाधीन दि. १९ ऑगस्ट, २०१९ च्या शासन निर्णयान्वये “मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना” राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेची अंमलबजावणी विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याप्रवण १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यातील सर्व तालुके तसेच, उर्वरीत महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे. सदर योजना राज्यातील उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता, या अनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. drip subsidy application
शासन निर्णयः संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
संदर्भाधीन दि. १९ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयान्वये विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यातील सर्व तालुके तसेच, उर्वरीत महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून आता या शासन निर्णयान्वये राज्यातील उर्वरित १०७ तालुक्यांचा सदर योजनेत समावेश करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर १०७ तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेची अंमलबजावणी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून करण्यात यावी, सदर तालुक्यांची यादी या शासन निर्णयासोबत सहपत्रित करण्यात येत आहे. mukhyamantri shaswat sinchan yojana 2021
?? खालील लिंकवर क्लिक करून अर्ज करा ??
शेतकरी मित्रांनो कागदपत्रे पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करा.
.
?? खालील लिंकवर क्लिक करून अर्ज करा ??
शेतकरी मित्रांनो कागदपत्रे पाहण्यासाठी व अर्ज करण्यासाठी वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करा.