आधार कार्डबाबत ‘या’ दोन सेवा बंद, नागरिकांची होणार अडचण..!! - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

आधार कार्डबाबत ‘या’ दोन सेवा बंद, नागरिकांची होणार अडचण..!!

0
4.5/5 - (2 votes)

‘आधार कार्ड’.. प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक नि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा. बँकेत खाते सुरु करायचं असो, वा गॅस सिलिंडरचे अनुदान हवं असेल किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची मागणी केली जातेच..

बऱ्याचदा आधार कार्ड तयार करताना, नजरचूकीने काहीतरी राहून जाते.. कधी नाव चुकतं, कधी जन्मतारीख, कधी पत्ता, तर कधी मोबाईल नंबर..! शक्यतो आधार कार्ड काढताना आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं असतं.. अर्थात, नंतर ही चूक दुरुस्तही करता येत होती. अर्थात, त्यासाठीही काही मर्यादा घालून दिल्या होत्या..

मात्र, आता आधार कार्ड अपडेट करणं अवघड होणार आहे.. कारण, ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ (UIDAI) कडून आधार कार्डशी संबंधित दोन सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. त्याचा फटका सगळ्याच आधार कार्डधारकांना बसणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

‘आधार’बाबत कोणत्या सेवा बंद..?

पत्ता प्रमाणीकरण पत्र
‘युआयडीएआय’कडून ‘अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर’द्वारे आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची सुविधा पुढील आदेश येईपर्यंत बंद केली आहे. आपल्या वेबसाइटवरूनही ‘अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर’शी संबंधित पर्याय काढून टाकला आहे. पुढील आदेश येईपर्यंत पत्ता प्रमाणीकरण पत्राची सुविधा बंद केल्याचे ‘युआयडीएआय’कडून सांगण्यात आले.

‘युआयडीएआय’च्या या निर्णयामुळे लोकांना आधार कार्डमधील पत्ता अपडेट करण्यात अडचणी येणार आहेत. विशेषत: जे लोक भाड्याने राहतात किंवा सतत नोकरी बदलत असतात, त्यांना आता ‘आधार’वर पत्ता अपडेट करणे मुश्किल होऊ शकतं.. पत्त्याबाबत इतर कोणताही पुरावा नसणाऱ्यांची मोठी अडचण होणार आहे..

आधार कार्डचे प्रिंटिंग बंद
युआयडीएआय’चा दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे, जुन्या शैलीतील ‘आधार कार्ड’ रिप्रिंटची सेवा बंद करण्यात आली आहे. जुन्या कार्डाऐवजी ‘युआयडीएआय’कडून आता प्लास्टिक ‘पीव्हीसी’ आधार कार्ड जारी केलं जातं. हे कार्ड सोबत बाळगणंही सोपं आहे.. खिशात आणि वॉलेटमध्ये ते सहज ठेवता येते..

आधार मदत केंद्राने याबाबत एक ट्विट केलंय.. त्यात म्हटलंय की ऑर्डर आधार पुनर्मुद्रण सेवा बंद केली आहे. त्याऐवजी आधार पीव्हीसी कार्ड ऑनलाइन ऑर्डर करू शकता.. ई-आधारची प्रिंट आउटही काढू शकता. ते कागदाच्या स्वरूपात ठेवू शकता.

finger down
Share via
Copy link