महागाईचा आणखी एक झटका; 1 जूनपासून महागणार या वस्तू!! - Amhi Kastkar

महागाईचा आणखी एक झटका; 1 जूनपासून महागणार या वस्तू!!

4.7/5 - (3 votes)

गेल्या काही दिवसांपासून सर्वच वस्तूंची भाववाढ होत आहेत. पेट्रोल-डिझेल, गॅस आणि किराणामालाच्या दरांतील वाढ कायम आहे. रोज कोणत्या न कोणत्या वस्तूंचे भाव वाढल्याचा बातम्या कानावर येत आहेत. अशातच आता अजून एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

1 जूनपासून कारच्या किमतीत देखील वाढ होणार आहे. थर्ड पार्टी मोटर व्हेईकल इन्शुरन्सच्या किमती वाढल्याने कारच्या किमती वाढणार असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे व्हेईकल इन्शुरन्सचा प्रीमियम वाढणार आहे. 1 जून 2022 पासून सरकार काही नियम बदलले आहेत, त्यात थर्ड पार्टी मोटर व्हेईकल इन्शुरन्सचाही समावेश आहे. सरकारने याबद्दलची अधिसूचना जारी केली होती.


2019-20 मध्ये, प्रायव्हेट कार्सचा एका वर्षासाठीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स 2072 रुपये होता, परंतु जून 2022 मध्ये दरवाढीनंतर तो 2094 रुपये असेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने दिली आहे.

थर्ड पार्टी इन्शुरन्सची एका वर्षाच्या प्रीमियमची रक्कम कारच्या इंजिन क्षमतेवर किंवा सीसीवर अवलंबून असते. 1000 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या कारसाठी विमा प्रीमियम 2094 रुपये व 1000 ते 1500 सीसी कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स 3221 रुपयांवरून 3416 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. 1500 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या कारसाठी इन्शुरन्स प्रीमियम 7890 रुपयांवरून 7897 रुपये करण्यात आला आहे.

इलेक्ट्रिक व्हेईकलची किंमत वाढणार आहेत. पॉवर आउटपुट 65 kW पेक्षा जास्त असलेल्या प्रायव्हेट इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी 6712 रुपये इन्शुरन्स प्रीमियम भरावा लागणार आहे. 3 kW पेक्षा कमी क्षमतेच्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी प्रीमियम 457 रुपये असेल. 3 kW ते 7 kW इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी इन्शुरन्स प्रीमियम 607 रुपये भरावा लागेल.

थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम फक्त कार आणि इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच नाही तर दुचाकींसाठीही महागला आहे.
7 किलोवॅट ते 16 किलोवॅट क्षमतेच्या दुचाकींसाठी इन्शुरन्स प्रीमियम 1161 रुपये असेल तर 16 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकींसाठी इन्शुरन्स प्रीमियम 2383 रुपये असेल.

व्हेईकल इन्शुरन्ससंदर्भातील सरकारचा हा नवा आदेश 1 जूनपासून लागू होणार आहे. त्यामुळे दुचाकी आणि कार, तसंच इलेक्ट्रिक व्हेईकलच्या एका वर्षासाठीच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सची किंमत महागणार आहे. परिणामी आता नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे.

Leave a Comment

Share via
Copy link