[ad_1]
मुंबई। कोरोनामुळे निधन झालेले धारावी शाहूनगर पोलीस स्टेशनचे एपीआय अमोल कुलकर्णी यांनी शेअर केलेला तो फोटो माझ्या नजरेपुढून जातंच नाहीय… अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या भावनांना वाट करून दिलीय. सध्या महाराष्ट्रातील मुंबई शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलिस यंत्रणा देखील रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक पोलिसांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा बळी जात आहे. नुकतेच मुंबईतील धारावी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल कुलकर्णी यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. गृहमंत्री देशमुख यांनी कुलकर्णी यांना आदरांजली वाहत मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम केला होता. आज त्यांनी याबाबत एक ट्विट करत अमोल कुलकर्णी यांच्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या भावना व्यक्त केल्यात.
[ad_2]
Source link