Ativrushti Nuksan Bharpai 2022 | राज्यातील १० जिल्ह्याना अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर ! पहा तुमचा जिल्हा आहे का
नमस्कार मित्रांनो,मित्रांनो राज्यात परतीच्या पावसामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होत. अशा प्रकारे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत वितरित करण्याकरता आज 17 नोव्हेंबर 2022 रोजी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन. १० जिल्ह्यातील 12 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी 1286 कोटी रुपयांचा वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच संदर्भातील हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज 17 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे.
मित्रानो या शासन निर्णयाच्या माध्यमातून जिरायत क्षेत्रासाठी 6800 प्रति हेक्टर च्या ऐवजी आता 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर. ३ हेक्टर च्या मर्यादेमध्ये बागायती क्षेत्रासाठी 13 हजार 500 रुपयांचा ऐवजी 27000 प्रति हेक्टर. ३ हेक्टर च्या मर्यादेमध्ये,तर फळबागांसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर चे मर्यादेमध्ये हि मदत वितरित केली जाणार आहे.
GR PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
याच्या साठी आपण जर पाहिलं विभागीय आयुक्त औरंगाबाद आणि विभागीय आयुक्त पुणे यांच्या माध्यमातून 19 ऑक्टोबर 2022 याप्रमाणे 4 नोव्हेंबर 2022 रोजी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने 1286 कोटी 74 लाख 66 हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आपण आता पाहणार आहोत की हे १० जिल्हे कोणते आणि या जिल्ह्यांसाठी किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे.
१० जिल्हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी हि वाढीव दरानं मदत वितरित करण्यासाठी या ठिकाणी हि मंजुरी देण्यात आलेले आहे. या मदतीचे वाटप केल्यानंतर लाभार्थ्याची यादी आणि मदतीचा तपशील हा जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा अशा प्रकारच्या सूचना देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आपण mharashtra.gov.in या संकेतस्थळाचे पाहू शकता.