बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट)

1
5/5 - (2 votes)

Balasaheb Thackeray Krushi Vyavsay v Gramin Parivartan Prakalp (SMART): महाराष्ट्र सरकारनं बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 10 कोटी 3 लाख 50 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य सरकारच्या कृषी विभागानं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. राज्य सरकारनं सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी हा निधी मंजूर केला आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) हा प्रकल्प 2019-20 ते 2026-27 या कालावधीसाठी राबवण्यात येत आहे. (Maharashtra Government approve fund for SMART Project)

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय प्रकल्प नेमका काय?

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान व महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात “महाराष्ट्र राज्य  कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची” (State of Maharashtra’s Agribusuness and Rural Transformation) आखणी व अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रकल्प सुरु झाल्यानंतर त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. राज्याच्या कृषी व ग्रामीण उपजीविका क्षेत्रामध्ये “स्मार्ट” उपाययोजना राबवून ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मोठे परिवर्तन घडवून आणण्याचा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

प्रकल्पाचं ध्येय

ग्रामीण भागातील उद्योजकतेला बळकटी देऊन कृषी व्यवसायांच्या उभारणीला बळकटी देणे, त्यांना अधिक बाजारपेठा उपलब्ध करुन देणे. कृषी व्यवसांयाची लवचिकता आणि संसाधन वापरण्याची कार्यक्षमता वाढवणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ठ आहे. या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी संघटीत असणं अनिवार्य आहे. कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, पणन विभागासह इतर विभागांमार्फत या प्रकल्पाची अंमबलबजावणी केली जाणार आहे.

स्मार्ट प्रकल्पाचा कालावधी

महाराष्ट्र शासनानं हा प्रकल्प सात वर्षांच्या कालावधीसाठी राबवला आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 2100 कोटी रुपये असून जागतिक बँकेकडून 1470 कोटी तर राज्य सरकार 560 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही योजना 2020-21 ते 2026-27 या कालावधीपर्यंत राबवला जाईल. या प्रकल्पामध्ये कृषी सहकारी संस्थेला प्रकल्प किमतीच्या 60 टक्के अनुदान दिलं जाते. स्मार्ट या प्रकल्पासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया डिसेंबर 2020 मध्ये सुरु होती. शेतकरी गटांनी या योजनेविषयी सविस्तर माहिती घेण्याासाठी https://www.smart-mh.org/ या वेबसाईटला भेट द्यावी.

तपशीलस्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे१) शेतकरी गटाची स्थापना करणे – नोदनी प्रमाणपत्र
२) 7/12 आधार कार्ड
३) 8 ए
4) बँक पासबूक झेरॉक्स
5) हमीपत्र
6. गटाचा ठराव
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे )मार्गदर्शक सूचना जा.क्र/आत्मा/स्मार्ट/345/2021 कृषि आयुक्तालय पुणे दी 20/05/2021
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबीउपलब्ध नाही
ऑनलाईन सुविधा आहे का –होय
असल्यास सदर लिंक –https://www.smart-mh.org/
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी –प्रकल्प संचालक,आत्मा,वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –संबधित नाही
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंकसंबधित नाही
कार्यालयाचा पत्ताप्रकल्प संचालक आत्मा वर्धा, डॉ सचिन पावडे हॉस्पिटल बॅचलर रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक7152250242
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडीatmawardha@gmail.com

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी तसेच पुढे संपूर्ण माहितीसाठी 

finger down
Balasaheb Thackeray Krushi Vyavsay v Gramin Parivartan Prakalp SMART
Share via
Copy link