Bambu Lagwad Yojana 2021-2022 - बांबू लागवड करा नि 40 वर्षे बसून खा...सरकार कडून मिळेल इतके अनुदान - Amhi Kastkar

Bambu Lagwad Yojana 2021-2022 – बांबू लागवड करा नि 40 वर्षे बसून खा…सरकार कडून मिळेल इतके अनुदान

4/5 - (3 votes)

Bambu Cultivation in Marathi: शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी आहे. सध्याच्या काळात उत्पादन खर्च वाढल्याने शेती परवडत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून कायम केली जाते. मात्र, आता पारंपरिक शेतीला टाटा, बाय बाय करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरल्यास शेतीतून भरघोस कमाई करता येऊ शकते.

 अटल बांबू समृद्धी योजना 2022 सुरु 

कमी कष्टात, कमी पाण्यावर, कमी भांडवलात नि तेही अगदी खडकाळ, डोंगराळ जमिनीतून दरवर्षी लाखोंचे उत्पन्न देणाऱ्या एका शेतीपिकाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे, या पिकासाठी सरकारही मदतीचा हात देते. ही पीक म्हणजे, बांबू लागवड..!

वडिलोपार्जित जमीन नावावर करणे झाले सोपे, नाही लागणार कोणताही शुल्क फक्त करा एकच अर्ज !

अगदी नापीक, निरुपयोगी जमिनीत बांबू लागवड करता येत असून, त्यातून शेतकऱ्याला दरवर्षी मोठी कमाई होऊ शकते. एकदा बांबू लागवड केली, तर अगदी 40 वर्षे काहीही न करता कमाई सुरु राहते. बांबू लागवडीसाठी मध्य प्रदेशमध्ये तर शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाते.

Bambu Lagwad Yojana 2022

मोदी सरकारनेही शेतीसाठी ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत बांबू लागवडीसाठी शेतकर्‍याला प्रति रोप 120 रुपयांचे सरकारी साहाय्य मिळेल. जानेवारी-2018 मध्ये केंद्र सरकारने बांबूचा झाडांच्या श्रेणीतून काढून गवताच्या श्रेणीत समावेश केला. त्यामुळे बांबू तोडण्यावर वन कायदा लागू होत नाही.

अर्थात, हा कायदा केवळ खासगी शेतकऱ्यांसाठी करण्यात आला आहे. जंगलातील बांबू तोडण्यास मनाई असून, तेथे कोणतीही सूट नाही. तेथे वन कायदा लागू होणार आहे.

घरबसल्या 50 हजार रुपयांचे लोन फक्त 2 मिनिटात तेही बिनव्याजी तात्काळ मिळणार

बांबू शेती कशी करणार?

बांबूची शेती हे एका हंगामातील पीक नाही. त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. बांबू तयार व्हायला सुमारे 4 वर्षे लागतात. चौथ्या वर्षी त्याची कापणी करता येते. साधारणपणे 3 बाय 2.5 मीटरवर बांबूचे एक रोप लावलं जातं. त्यातून सुमारे एक हेक्टरवर 1500 रोपे लावली जातील.

दोन रोपांमधील मोकळ्या जागेत आंतरपीकही घेता येता. दर 4 वर्षांनंतर बांबूची कापणी करता येते. त्यामुळे दरवर्षी त्याची लागवड करण्याची गरज नाही. एकदा बांबू लागवड केली, की ती 40 वर्षे टिकते. त्यातून दरवर्षी लाखो रुपयांची कमाई होते.

Bamboo Cultivation in Marathi

बांबूच्या 136 प्रजाती आहेत. त्यामुळे बांबू शेती करण्यापूर्वी त्याच्या वाणांची माहिती असायला हवी. आपल्याला कोणत्या प्रकारचे बांबू लावायचे आहेत, आपण बाजारात ते कसे विकणार आहोत, याबाबत आधीच नियोजन करा..

योजनेचे उद्दिष्टे:-

शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करणे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला जोड देण्यासाठी शेत जमिनीवरील बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढविणे बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यास उपजिविकेचे साधन निर्माण करणे व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याची मदत करणे

टिशू कल्चर बांबू रोपाकरिता प्रजाती:-

महाराष्ट्रामध्ये मानवेल कटांग या प्रजाती विदर्भ क्षेत्रात तर मांगा ही प्रजाती कोकण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळून येते तर बांबू क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून काम करणार्‍या तज्ञ सोबत चर्चा करून वरील तीन स्थानिक प्रजाती व्यतिरिक्त खालील पाच प्रजाती निवडण्यात आले आहेत

  1. Bambusa Balcooa
  2. Dendrocalamus Brandisii
  3. Bambusa Nutan
  4. Bambusa Tulda

राष्ट्रीय बाबुराव येण्याच्या व्यापारी दृष्टिकोनानुसार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लागवड योग्य पाच प्रजाती पैकी पहिले चार मोठे जे बांबू असून त्यांच्यापासून बायोमास चांगल्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे तर Bambusa Tulda ही प्रजाती (यातील दोन गटाची अंतर जास्त असून) अगरबत्ती व इतर हस्तकला कामासाठी उपयुक्त प्रजाती आहे

बांबू लागवडीचे फायदे/वैशिष्ट्ये:-

1) बांबू प्रजातीची जीवनचक्र 40 ते 100 वर्षे असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्यकता नाही अन्नधान्य तसेच भाजीपाला प्रमाणे दर वर्षी बांबू लागवड करण्याची गरज नाही बांबूचे जीवनचक्र म्हणजेच बांबूला फुलोरा येईपर्यंत बांबू जिवंत असतो
2) बांबोला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेती सारखे नुकसान होत नाही तर बांबूच्या बेटा मध्ये दरवर्षी आठ ते दहा नवीन बांबू तयार होत असतात पाणी साचलेल्या पाण्यात व जमिनीवर शार युक्त जमीन तसेच मुरमाड जमिनीवर सुद्धा बांबूची लागवड यशस्वीरीत्या होऊ शकते इतर पिकांच्या तुलनेत बांबूचे शेतीवर 30 ते 40 टक्के खर्च कमी येतो
3) पहिल्या व दुस-या वर्षी चे बांबू सोडून तिसऱ्या वर्षांत बांबू काढता येत असल्याने शाश्वत उत्पन्न मिळू शकते
4) बांबू लागवडीमुळे शेत जमिनीची धूप व जलसंवर्धन या दोन्ही बाबींचा सुद्धा फायदा मिळेल

बांबू पासून उत्पन्न होणाऱ्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बाजारपेठ

बांबू पासून बनणाऱ्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत

टिशू कल्चर बांबू रोपंचा दर

टिशू कल्चर बांबू रोपे सदर अंदाजे रुपये पंचवीस रुपये प्रति रोप आहे शेतकरी व भूरूपे अगोदर खरेदी करून त्याचे शेत जमिनीवर लागवड करतील तसेच जमिनीवरून केलेल्या बांबूला उडीचे तपासणीनंतर बांबू रोपाची किमत पैकी शासनाकडून किंवा त्याखालील शेती असलेल्या भूधारकांना 80 टक्के तर चार हेक्टरपेक्षा अधिक शेती असलेल्या भूधारकांना 50 टक्के सवलतीच्या दराने सबसिडी त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल तसेच उर्वरित भाग रूपा ची किंमत अनुक्रमे 20 ते 50 टक्के प्रमाणे खर्च हा शेतकऱ्यांनी स्वतः करायचा आहे

बांबू रोपे लागवड अनुदान

4 हेक्टर (10 एक्कर) जमीन असल्यास 80 टक्के अनुदान तर 10 एकर जमीन पेक्षा जास्त असल्यास 50 टक्के अनुदान शासनाकडून थेट सबसिडी च्या मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल

लाभार्थ्यांची निवड

सदर योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे त्यासाठी खलील प्रमाणे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
1. शेतीचा गाव नमुना नंबर सातबारा गाव नमुना नंबर 8 गाव नकाशा ची प्रत
2. ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपंचायत यांच्याकडून रहिवासी असल्याबाबतचा दाखला
3. बांबू लागवड करावी च्या शेतामध्ये बांबूचे अपेक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी ठिबक सिंचन व बांबू रोपे लहान असताना डुकरा पासून रुपी सुरक्षित ठेवण्यासाठी जे संरक्षण पाण्याची सोय असल्याबाबतचे हमीपत्र
4. आधार कार्डची प्रत

5. बँक खात्याचे तपशील व पासबुकची प्रत कोरा धनादेश आची छायांकित प्रत (Cancel Cheque)
6. अर्जदार शेतकऱ्यांनी त्यांचे बँकेचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्यक राहील आणि त्याकरिता त्याने बँकेला दिलेल्या पत्राची व बँकेकडून मिळाल्या पोहोच पावती ची प्रत
7. शेतामध्ये विहीर शेततळे बोरवेल असल्याचे विहित प्रपत्रात हमीपत्र
8. बांबू रोपांची निगा राखणे व संरक्षण करणे संदर्भात विविध प्रपत्रात हमीपत्र बंदपत्र
9. जिओ टॅग जी आय एस द्वारे फोटो पाठवणे बाबत हमीपत्र
10. ज्या शेतजमिनीवर तसेच शेतांच्या बांधावर बांबू लागवड करावयाची आहे ते शेत्र नकाशावर हिरव्या रंगाने दर्शविणे

अंमलबजावणीची पद्धत:-

टिशू कल्चर रोपे लागवड प्रति हेक्टरी 500 रोपे (5 मी.×4 मी.) याप्रमाणे पाचशे रुपये अधिक वीस मरळी याप्रमाणे शंभर रुपये असे एकूण 600 रुपये प्रति हेक्‍टरी करावयाची आहे

टिशू कल्चर रोपाची किंमत:-

उदा. 25 रुपये प्रति रोप

हे पण वाचा –

Bambu Lagwad Yojana 2022

1 thought on “Bambu Lagwad Yojana 2021-2022 – बांबू लागवड करा नि 40 वर्षे बसून खा…सरकार कडून मिळेल इतके अनुदान”

Leave a Comment

Share via
Copy link