Banana Farming: ये हुई ना बात…! शेतकऱ्यांनी केळीची शेती सुरु केली अन लाखोंची कमाई झाली; वाचा त्यांच्या यशाचे रहस्य - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Banana Farming: ये हुई ना बात…! शेतकऱ्यांनी केळीची शेती सुरु केली अन लाखोंची कमाई झाली; वाचा त्यांच्या यशाचे रहस्य

0
5/5 - (2 votes)

[ad_1]

Banana Farming: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात फळ शेती (Farming) केली जात आहे. यामध्ये केळी या पिकाचा देखील समावेश आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात केळी पिकाची लागवड करत असतात आणि यातून चांगली मोठी कमाई (Farmers Income) करतात.

आपल्या राज्यातं देखील केळीची शेती (Banana Farming) विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील खानदेश प्रांतातील जळगाव जिल्ह्यात (Jalgaon) मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या केळीला जीआय टॅग देखील देण्यात आला आहे.

यामुळे जळगाव जिल्ह्याला केळीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मित्रांनो काळाच्या ओघात जर शेतीमध्ये बदल केला तर निश्चितच फायद्याचा ठरतो. पारंपारिक पिकांऐवजी नगदी पिकांची तसेच फळबाग लागवड केली तर निश्चितच शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. उत्तर प्रदेश राज्यातील शेतकऱ्यांनी देखील काळाच्या ओघात बदल करत केळी या फळ पिकाची शेती करून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमयाही साधली (successful farmer) आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील गाझीपूरच्या शेतकऱ्यांनी केळीची लागवड (Banana Crop) करून लाखो रुपये उत्पन्न कमवून दाखवले आहे. एक काळ होता गाजीपूरचे व्यापारी दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून केळी आणायचे आणि इथल्या बाजारपेठेत पुरवायचे, पण आता तसे राहिले नाही. 2012 पासून परिस्थिती बदलली आहे.

जिल्ह्यातील रेवतीपूर येथील काही शेतकऱ्यांनी 2012 मध्ये केळीची व्यावसायिक लागवड सुरू केली आणि त्यांना यात यश मिळाले आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की, येथील शेतकरी केवळ जिल्ह्याच्या गरजा भागवत नसून इतर अनेक जिल्ह्यांना आणि बिहारच्या सीमेला लागून असलेल्या भागात केळीचा पुरवठा करत आहेत.

केळी शेतीत मिळालेल्या यशाने उत्साहित झालेले शेतकरी आता नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. केळी लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी येथील शेतकरी आता केळीचे रोपे देखील तयार करत आहेत. या झाडांपासून उत्पादन घेण्यासाठी ते पॉलिहाऊसमध्ये त्यांची लागवड करत आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रयत्नाने सरकारही खूश आहे. त्यामुळेच मुख्य विकास अधिकारी यांनी शेतकऱ्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी येथे येऊन त्यांना प्रोत्साहन देखील दिले आहे.

गाझीपूरच्या रेवतीपूर ब्लॉकमधील शेतकरी पूर्वी पारंपरिक शेतीवर अवलंबून होते. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात फारसा बदल झाला नाही. पण 2012 मध्ये शेतकरी छोटू राय आणि इतर शेतकऱ्यांनी मिळून अल्प प्रमाणात केळीची लागवड सुरू केली. यश पाहून आजूबाजूच्या गावातील शेतकरीही त्यात सामील झाले. आजच्या घडीला गाझीपूरमध्ये केळी लागवडीचे क्षेत्र सुमारे 1700 ते 1800 एकरांपर्यंत पोहोचले.

केळी पिकातून मिळतोय दुप्पट नफा 

केळीच्या लागवडीसाठी एकरी 1 लाख 20 हजार रुपये खर्च येत असल्याचे शेतकरी छोटू राय यांनी सांगितले. ही संपूर्ण 1 वर्षाची लागवड आहे आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांचे उत्पन्न जवळपास दुप्पट होते. म्हणजेच येथील शेतकरी बांधवांना केळीच्या पिकातून एकरी अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे.

म्हणजेच खर्च वजा जाता एकरी एक लाख रुपये उत्पन्न येथील शेतकरी बांधव मिळवत आहेत. इतर पिकांमध्ये केळीच्या पिकासारखे दुपटीने उत्पन्न प्राप्त होत नसल्याचे शेतकरी छोटू राय सांगतात. केळी आणि शेतीसोबतच छोटू राय यांनी मार्केटिंगवर विशेष लक्ष दिले आणि आज बक्सर, आरा, पटना, चिरैयाकोट, माऊ आणि आझमगड येथील लोक त्यांच्या शेतात केळी खरेदी करण्यासाठी येतात.

शेतकरी अनिल राय यांनी सांगितले की, सध्या गाजीपूरमध्ये दररोज 150 टन केळी वापरली जातात. 13 ते 14 रुपये किलो दराने शेताच्या बांधावरच भाव मिळतो. आता येथील शेतकऱ्यांनी खर्च कमी करण्यासाठी कंपनीकडून रोपे विकत घेण्याऐवजी स्वत: तयार करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीकडून प्लांट खरेदी करण्यासाठी सुमारे 20 रुपये खर्च येतो, तर तो स्वत: तयार करण्यासाठी 10 ते 11 रुपये खर्च येतो. ते इतर शेतकऱ्यांना 1 ते 2 रुपये प्रति रोप एवढा नफा काढून केळीचे रोपं विकत आहेत.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link