भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022 – bhausaheb fundkar falbag yojana online application 2022 - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022 – bhausaheb fundkar falbag yojana online application 2022

0
5/5 - (2 votes)

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नवीन राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना (bhausaheb fundkar falbag yojana) मंजूर करण्याचा निर्णय दि. 20 जून 2018 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेला आहे.

योजनेच्या माध्यमातून पिक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करूण देणे शासनास शक्य होणार आहे.

Bhausaheb fundkar falbag yojana online application 2022

तसेच, ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास देखील सहाय्यभूत ठरणार आहे. त्याचप्रमाणे, फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करून काही प्रमाणात हवामान बदल आणि ऋतू बदलाची दाहकता व तीव्रता सौम्य करण्यास देखील मदत होणार आहे.

शासन निर्णयानुसार राज्यात सन 2018-19 च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही नवीन राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे.

योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणे.

योजने अंतरगत आंबा, डाळींब, काजू, पेरू, सीताफळ आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी, अंजीर ही फळ पिके येतात.

महाराष्ट्रात सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य टप्प्याटप्प्याने दिले जाते.

योजनेचा लाभ केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांना घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ अनुज्ञेय राहणार नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र असणाऱ्या लाभार्थी व्यतिरीक्त इतर लाभार्थींना या योजनेतून लाभ घेता येईल.

Bhausaheb fundkar falbag yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता व कागदपत्रे :

१. लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे आवश्यक आहे.

२.सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व अज्ञात मुले ).

३. लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. संस्थात्मक लाभार्थांना लय योजनेचा लाभ देय नाही.

४. शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर ७/१२ असणे गरजेचे आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.

५. ७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती असणे आवश्यक आहे.

६.परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.

७.इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.

अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

bhausaheb fundkar falbag yojana online application 2022

https://mahadbtmahait.gov.in/

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% अश्या तीन वर्षात देण्यात येते. लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% ठेवणे आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणे, असे उद्दिष्ट आहे.

शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे :-  जमीन तयार करणे, खत मिश्रणाने खड्डे भरणे, कुंपण करणे, खते देणे, आंतर मशागत करणे.

शासन अर्थसहाय्यित बाबी / कामे :-  खड्डे खोदणे, कलमे/रोपे लागवड, नांग्या भरणे, ठिबक सिंचन करणे, पीक संरक्षण.

bhausaheb fundkar falbag yojana online application 2022
Share via
Copy link