Big decision of state government In that scheme farmers will get Rs 75,000 | राज्य सरकारचा मोठा निर्णय 'त्या' योजनेत शेतकऱ्यांना मिळणार 75 हजार - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Big decision of state government In that scheme farmers will get Rs 75,000 | राज्य सरकारचा मोठा निर्णय ‘त्या’ योजनेत शेतकऱ्यांना मिळणार 75 हजार

0
Rate this post

[ad_1]

Big decision of state government
Big decision of state government

State government:  जाता जाता राज्य सरकारने (State government) एक मोठा निणर्य घेतला आहे.  शेतकऱ्यांसाठी (farmers) राज्यात सुरु असलेल्या शेततळे योजनेसाठी (Setatale yojana) आता शेतकर्‍यांना 50 हजार ऐवजी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

याबाबतचा अध्यादेश देखील जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

राज्यातल्या दुष्काळी परिस्थिती नंतर सरकारने शेतकर्‍यांच्या शेतीच्या पाणीटंचाईच्यादृष्टीने शेततळे उभारण्यासाठी योजना आणली. राज्य सरकारकडून ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. यामुळे पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला आहे. 

शेतात पाणी साठवून ठेवत ठिबक पद्धतीने पाणी देऊन अनेक शेतकर्‍यांनी आपली शेती आज समृद्ध बनवली आहे. आता हेच शेततळे आता शेतकर्‍यांसाठी दुहेरी वरदान ठरलंय. मत्स्य पालन योजनेमुळे पाणीसाठा करणार्‍या या तळ्यातून आता नवा जोडधंदा शेतकर्‍यांना मिळाला आहे. त्यात आता अनुदानात आणखी वाढ झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link