Take a fresh look at your lifestyle.

Big News Lockdown – गावी जाण्यासाठी इच्छुक नागरिकांसाठी ठाकरे सरकारचा ‘मोठा’ निर्णय

0


मुंबई । लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार यांच्यासह विद्यार्थी, पर्यटकही अनेक भागात अडकले आहेत. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकार तसंच राज्य सरकारनं शिथिलता दिल्यानंतर या सर्वाना त्यांच्या स्वगावी पोहोचवण्यात येत आहे. त्यासाठी सरकारनं रेल्वे, बस आणि खासगी वाहनाने प्रवास करण्याचीही मुभा दिली आहे. राज्यातून मजूरांना घेऊन जाण्यासाठी स्पेशल श्रमिक ट्रेनचीही सुविधा केली आहे. तसंच जिल्ह्यांतर्गतही मजूरांची स्थलांतर करण्यात येत आहे. मात्र या सर्वांना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 

राज्यातल्या विविध जिल्ह्यांत किंवा इतर राज्यात प्रवास करणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यासाठी ई-पास किंवा पोलिस परवानगी मिळविण्यासाठी कोविड 19 ची लक्षणे नसलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक आहे. दरम्यान आता ही तपासणी मोफत केली जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून हे स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून या संदर्भात एक ट्विट केलं आहे. 

लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरीत कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापुर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे. शासकीय तसेच महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत ही वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

pic.twitter.com/uxmyxrRMWd

Previous articleKisan Vikas Patra देईल गुंतवणुकीच्या दुप्पट रक्कम; जाणून घ्या या सरकारी योजनेची माहिती
Next articleगगनबावडा तालुक्यात आख्खी अंगणवाडीची इमारतच ‘गायब’; गावात उडाली खळबळ, मात्र प्रशासन सुस्तच..!Source link

X