Brinjal Farming: शेतकरी कमी दिवसात बनणार लखपती..! 'या' जातीच्या वांग्याची शेती शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Brinjal Farming: शेतकरी कमी दिवसात बनणार लखपती..! ‘या’ जातीच्या वांग्याची शेती शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

0
Rate this post

[ad_1]

Brinjal Farming: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) फार पूर्वीपासून भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Farming) करत आले आहेत. भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची देखील ठरत आहे. भाजीपाला लागवड कमी दिवसातच शेतकरी बांधवांना उत्पादन मिळवून देत असल्याने अल्पकालावधीतचं शेतकर्‍यांना लाखो रुपयांचे उत्पन्न (Farmers Income) मिळते.

यामुळे अलीकडे शेतकरी बांधव पारंपारिक पिकांबरोबर भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करू लागले आहेत. वांग्याचे पीक देखील भाजीपाला पिकांपैकी एक प्रमुख पीक आहे. तज्ञांच्या मते वांग्याची शेती शेतकरी बांधवांसाठी अधिक फायद्याची,ठरते. कारण की वांग्याला बाजारपेठेत कायमच चांगला दर (Brinjal Rate) मिळत असतो.

शिवाय वांग्याला बारामाही बाजारपेठ उपलब्ध असल्याने शेतकरी बांधवांसाठी यांची शेती विशेष फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत आज आपण वांग्याच्या काही सुधारित जातींची (Brinjal Variety) माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

तज्ञांच्या मते, वांग्याच्या शेतीतून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी वांग्याच्या सुधारित जातींची लागवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे.  शेतकरी बांधवांनी कायम वांग्याच्या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जातींची निवड केली पाहिजे. अशा सुधारित जातींची लागवड केल्यास शेतकरी बांधवांना कमी दिवसातच चांगले उत्पन्न मिळणार आहे.

वांग्याच्या काही सुधारित जाती

•गोल जांभळ्या वांग्याच्या जाती: पुसा हायब्रिड ६, अर्का नवनीत, महिको हायब्रीड २

•क्लस्टर पर्पल व्हरायटी: महिको हायब्रीड नंबर 3, महिकोरवैया

•व्हायलेट लांब जाती: गुलाबी आणि एमएस-१७२

•पुसा पर्पल लाँग:- ही एक उच्च उत्पादन देणारी वांग्याची जात आहे. ही जात आगात लावली जाते. या जातीची लागवड आगात केल्यास यापासून चांगले उत्पादन मिळते. या जातीची लागवड शरद ऋतूमध्ये केली जाते. या जातीच्या वांग्याला हिवाळ्यात तयार होण्यासाठी सुमारे 75-80 दिवस लागतात. वसंत ऋतुमध्ये लागवड केल्यास या जातीपासून 100-110 दिवसात उत्पादन मिळण्यास सुरवात होते. वांग्याची ही जात खूप चांगले उत्पादन देते. या जातीपासून सरासरी 300 क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

•पुसा हायब्रिड-5:- वांग्याची ही एक सुधारित जात आहे. या जातींचे वांगे चमकदार आणि गडद जांभळ्या कलरचे असतात. वांग्याची ही जात चमकदार आकर्षक आणि गडद जांभळ्या रंगाची असते. त्यात हलके पेंडनकल देखील आहेत. या जातीच्या वांग्याचे वजन सुमारे 100 ग्रॅम असते. या जातीचे उत्पादन चांगले असते. या जातीपासून हेक्टरी 510 क्विंटल उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. या जातीच्या वांग्याच्या फांद्या अर्ध्या सरळ असतात.

या हंगामात प्रचंड उत्पादन होईल

वांगी हे उबदार हंगामातील पीक आहे. त्यामुळे ते थंडीसाठी अधिक संवेदनशील असते. थंडीच्या मोसमात कमी तापमानामुळे त्याची फळे खराब होतात. वांग्याच्या चांगल्या उत्पादनासाठी, दीर्घ उबदार हंगाम आवश्यक आहे. यासाठी दिवसाचे सरासरी तापमान १३-२१ अंश सेल्सिअस असावे. वांग्याचे बिया २४ डिग्री सेल्सिअस तापमानात चांगळ्ल्या विकसित होतात.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link