Business Idea: खरं काय! 'या' जातीच्या विदेशी चाऱ्याची शेती शेतकऱ्यांना लखपती बनवणार; 10 बिघा जमिनीत लागवड करा, 12 लाखांची कमाई होणारं - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Business Idea: खरं काय! ‘या’ जातीच्या विदेशी चाऱ्याची शेती शेतकऱ्यांना लखपती बनवणार; 10 बिघा जमिनीत लागवड करा, 12 लाखांची कमाई होणारं

0
Rate this post

[ad_1]

Business Idea: भारतीय शेतीत (Farming) आता काळाच्या ओघात मोठा बदल होताना बघायला मिळत आहे. शेतकरी बांधव (Farmer) आता फळबाग पिकांची तसेच नगदी पिकांची (Cash Crop) मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. आपल्या देशात आजही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते.

अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधवांनी कधीच चाऱ्याची देखील आपल्या देशात शेती केली जाऊ शकते याचा विचार केला नसेल. पण आपल्या देशात आता सुपर नेपीयर गवताची (Super Napier Grass) शेती केली जात आहे. खरं पाहता हे गवत मूळचे थायलंड या देशाचे आहे.

पण आता या गवताची आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जाऊ लागली आहे. पशुपालक शेतकरी बांधव याची मोठ्या प्रमाणात मागणी करत असल्याने या गवताची शेती आता मोठ्या प्रमाणात केली जात आहे. सुपर नेपियर घास लागवड करून 10 बिघा जमिनीत एक लाख रुपये महिना शेतकरी कमवत आहेत.

या गवताची लागवड करणारे शेतकरी आता लाखों रुपये कमवत आहेत. या गवताच्या शेतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यांची शेती दुष्काळग्रस्त भागात देखील केली जाऊ शकते. शिवाय ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी देखील सुपर नेपियर घास लावला जाऊ शकतो. पशुखाद्य म्हणून याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

या चाऱ्यात सुमारे 18 ते 20 टक्के प्रथिने असतात आणि सुमारे 35% पोषक तत्त्वे क्रूड फायबरच्या स्वरूपात आढळतात. सुपर नेपियर गवत हे सर्व हिरव्या चाऱ्यापैकी सर्वात पौष्टिक मानले जाते. हे बियाणे आणि कटिंग दोन्हीद्वारे तयार केले जाते.

सुपर नेपियर गवत किती काळ उत्पादन देते?

सुपर नेपियर घासचे उत्पादन झपाट्याने वाढत आहे. दूध उत्पादन करणारे डेअरी चालक वर्षभर त्याचा हिरवा चारा म्हणून वापर करतात. विशेष म्हणजे एकदा शेतात लागवड केली की सात ते आठ वर्षे यापासून उत्पादन मिळते.

त्याचे उत्पादन करणारे शेतकरी एका बाजूने क्रमाक्रमाने कापणी करून पुढे जातात आणि दुसऱ्या बाजूने शेतात एक कलम टाकल्यानंतर दुसरे कलम तयार होते. सुमारे 15 फुटांपर्यंत वाढणारे सुपर नेपियर गवत हिरवा आणि कोरडा चारा म्हणून वापरला जात आहे. या गवतामुळे शेतकरी आणि मोठ्या पशुपालकांच्या चाऱ्याची टंचाई दूर झाली आहे.

किती होणारं कमाई 

सुपर नेपियर गवताची लागवड करणारे मोठ्या प्रमाणावर करणारे शेतकरी सांगतात की, या नेपियर गवतातून 10 बिघामध्ये दरमहा एक लाखाचे उत्पन्न मिळते. सुपर नेपियर गवत कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक बनत आहे. त्याचा वापर उसाऐवजी बायोगॅसमध्येही केला जात आहे. यामुळे आता सुपर नेपियर घास बायोगॅसमध्ये वापरणारे मोठे कारखानेही विकत घेत आहेत.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link