Business Idea | cultivate these Crop, Earn Millions; The climate of Maharashtra is also best for the crop
[ad_1]

Business Idea: भारतात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव (Farmer) शेतीमध्ये (Farming) मोठा बदल करीत आहेत. शेतकरी बांधव आता बाजारपेठेत असलेल्या मागणीनुसार पीक पद्धतीत बदल करीत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून शेतकरी बांधवांनी फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) सुरू केली आहे. फळबाग पिकांमध्ये अननस या पिकाचा देखील समावेश होतो. या पिकाची देखील आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात लागवड (Pineapple Farming) केली जाऊ लागली आहे.
महाराष्ट्रातील हवामान विशेषता कोकणातील हवामान (Maharashtra Climate) या पिकासाठी मानवत असल्याचा दावा केला जातो. या परिस्थितीत कोकणातील शेतकरी आता अननस शेतीकडे वळू लागले आहेत. कोंकण व्यतिरिक्त राज्यातील इतरही भागात प्रायोगिक तत्त्वावर शेतकरी बांधव अननसची शेती करत आहेत.
विशेष म्हणजे शेतकरी बांधवांसाठी अननस शेती फायद्याची ठरत आहे. हेच कारण आहे की आता अननस शेतीचे क्षेत्र हळूहळू वाढत आहे. कृषी तज्ञ देखील शेतकरी बांधवांना शेतीमध्ये बदल करण्याचा सल्ला देतात.
तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी बाजारपेठेतील मागणीनुसार पीक पद्धतीत बदल केला तर निश्चितच त्यांना लाखों रुपयांची कमाई होऊ शकते. आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी अननस शेती मधील काही महत्त्वाच्या बाबी घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी.
अननस वर्षातून अनेक वेळा लावता येते:- अननस शेतीची सर्वात चांगली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या पिकाची लागवड वर्षातून अनेक वेळा करता येते. यामुळेच या पिकातून अधिक उत्पन्न मिळत असल्याचा दावा केला जातो. निश्चितचं शेतकरी बांधवांना वर्षातून एकदाच घेतलेल्या पिकांच्या तुलनेत या पिकातून जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता असते.
अननस आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर:- मित्रांनो जाणकार लोकांच्या मते, अननसमध्ये भरपूर फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. हेचं कारण आहे की अननसची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
अननस व्हिटॅमिन सी चा देखील एक चांगला स्रोत आहे. याच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हे थंडीपासून संरक्षण करते आणि सांधेदुखीच्या रुग्णांना आराम देते. निश्चितच औषधी गुणधर्मांमुळे अननसची बारामाही मागणी असते.
भारतात अननसाची लागवड कुठे केली जाते?:- मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, यापूर्वी भारतात अननसची केरळ, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, मिझोराम आणि आसाम या राज्यांमध्ये लागवड केली जात होती. मात्र आता काळाच्या ओघात परीस्थितीत मोठा बदल झाला आहे.
आता याची लागवड उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात देखील थोड्या बहुत प्रमाणात बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात देखील याची लागवड केली जाऊ शकते आणि शेतकरी बांधव याची लागवड करीत आहेत. महाराष्ट्रा समवेतच केरळ, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये देखील या पिकाची वर्षभर लागवड केली जात आहे.
कोणत्या प्रकारची जमीन योग्य आहे:- वालुकामय चिकणमाती असलेली शेतीजमीन याच्या लागवडीसाठी चांगली असते. ज्या भागात दमट हवामान आहे, तेथे 12 महिने आरामात याची लागवड केली जाते, अन्यथा वर्षातून दोनदाच लागवड करता येते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अननस वनस्पती फक्त एकदाच फळ देते. फळे मिळण्यासाठी पुन्हा पीक घ्यावे लागते.
[ad_2]
आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.