Business Idea| farmers do want to become millionaires in rainy season, do you want to ride on bullets Cultivate this flower, you will earn millions
[ad_1]

Business Idea: मित्रांनो भारतीय शेती (Farming) ही सर्वस्वी पावसावर आधारित आहे. हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. मित्रांनो यामुळे भारतातील पावसाळा शेतकऱ्यांसाठी (Farmer) आनंदाची भेट घेऊन येतो असे नेहमीचं बोलले जाते.
खरं पाहता आपल्या देशातील बहुतेक शेतकरी या पावसाळ्यात म्हणजे खरीप हंगामात (Kharif Season) नगदी पिके (Cash Crop) लागवड करतात, ज्यात फळे, भाजीपाला आणि तृणधान्ये या पिकाचा प्रामुख्याने समावेश होतो. मात्र कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, पावसाळ्यात म्हणजे खरीप हंगामात फुलशेती (Floriculture) केल्यास आपल्या विचारापेक्षा जास्त फायदा होतो.
विशेषता जरबेरा फुलांची लागवड (Gerbera Farming) केल्यास शेतकरी बांधवांना अधिक फायदा होऊ शकतो. जरबेरा फुलाला बाजारात मोठी मागणी असल्याने याची शेती शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न कमवून देत असल्याचा दावा कृषी क्षेत्रातील जाणकार करत असतात.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध जरबेराची फुले सुगंधी आणि आकर्षक असतात. ज्यामुळे मधमाश्या आणि फुलपाखरे देखील आकर्षित होतात. म्हणून जरबेरा फ्लॉवर लागवड तसेच मध शेतीसह आपण फ्लॉवर लागवड करून दुप्पट कमाई देखील करू शकता. निश्चितच जरबेरा फुलांची शेती शेतकरी बांधवांना दुहेरी फायदा देणारी आहे आणि यामुळे शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न मिळत असते.
जरबेरा फुलाचा उपयोग काय
जरबेराची सुवासिक फुले बहुतेक सजावटीसाठी वापरली जातात. त्याची फुले फक्त पाण्याच्या मदतीने 1 ते 2 आठवडे ताजी ठेवता येतात.
बहुतेक विवाहसोहळ्यांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये, सजावटीसह पुष्पगुच्छ स्वरूपात या फुलांचा वापर केला जातो.
जरबेराची फुले सुगंधी तर असतातच पण त्याची पाने आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठीही वापरली जातात. यामुळे या फुलांना सजावटीसाठी तसेच औषध तयार करण्यासाठी काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठी मागणी असते.
जरबेरा फुले एसेंशियल ऑइल आणि रूम फ्रेशनर बनवण्यासाठी देखील वापरली जातात.
जरबेराची लागवड महाराष्ट्रात करता येईल का?
जरबेरा फुलाची मागणी आणि वापर ज्या भागात सर्वाधिक असेल अशा भागात जरबेरा फुलांची शेती केल्यास शेतकरी बांधवांना चांगला फायदा मिळणार आहे. शेतकर्यांना हवे असल्यास ते जरबेरा फुलाची लागवड मोठ्या शहरांना लागून असलेल्या ग्रामीण भागात करू शकतात, कारण ते हॉटेल, लग्नसमारंभ, सण आणि फुलबाजारात ते सहज विकू शकतात.
जरबेराची व्यावसायिक किंवा कंत्राटी शेती करणे देखील फायदेशीर ठरू शकते, ज्यामध्ये काही कंपन्या एसेंशियल ऑइल आणि आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी त्याची लागवड करतात.
जरबेरा फुलाची लागवड खुल्या शेतात किंवा पॉलीहाऊस शेतीतही करता येते. त्याच्या लागवडीद्वारे, आपण अधिक उत्पन्नासाठी मधमाशी पालन युनिट देखील स्थापित करू शकता.
झारखंडची जमीन शेतीसाठी योग्य असली तरी महाराष्ट्र, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही अनेक शेतकरी त्याची लागवड करत आहेत. निश्चितच आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील जरबेराची शेती करू शकतात. मात्र यासाठी फुलांची मागणी आणि बाजारपेठ याचा विचार करून शेती करणे अधिक फायद्याचे राहणार आहे.
याच्या लागवडीतून चांगला फायदा मिळवण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या पिकांना ठिबक सिंचन तंत्रज्ञानाद्वारे पाणी द्यावे. त्यामुळे पैसा आणि श्रम दोन्ही वाचतील.
जरबेरा फुलांपासून लाखोंचा नफा
जरबेरा फुलांच्या लागवडीसाठी प्रारंभिक खर्च 5000 रुपयांपर्यंत येतो, ज्यामध्ये एकदा पेरणी आणि पुनर्लावणी केल्यानंतर पुढील 3 वर्षांसाठी फुलांचे उत्पादन उपलब्ध होते.
पहिल्यांदा पेरणी केल्यानंतर पुढील 90 दिवसांत फुले येण्यास सुरुवात होते, जेणेकरून किमान 10 फुले तोडता येतील.
पॉलीहाऊसमध्ये लागवडीसाठी 3200-3300 जरबेराची रोपे 30X30 मीटर जागेत रचना तयार करून लावता येतात.
जरबेराच्या एका फुलाची बाजारात किंमत 5 ते 6 रुपये आहे, त्यामुळे 700-800 फुलं एका वेळेत तोडून 3500 रुपयांचे उत्पन्न मिळते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जरबेराची लागवड करून प्रत्येक 6 महिन्यांत 1 लाख 80 हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो. निश्चितच शेतकरी पुत्र जरबेराची शेती करून बुलेटवर फिरण्याचे आपले स्वप्न देखील पूर्ण करू शकतात.
[ad_2]
आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.