[ad_1]
नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या ३ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे जवळपास साडेतेरा लाख लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांना (MSME’s) मदत झाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी (ता.७) संसदेत बोलताना सांगितले. राष्ट्रपतींच्या (President Of India) अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलतना मोदींनी ही माहिती दिली.
अर्थव्यवस्था जितनी ज्यादा Grow करेगी, उतने ही रोजगार के अवसर पैदा होंगे। पिछले 7 सालों में इसी पर हमारा फोकस रहा है, जिसका परिणाम है- आत्मनिर्भर भारत अभियान। pic.twitter.com/0hjmtzigg7
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2022
लोकसभेत बोलताना मोदी म्हणाले (Modi In Loksabha) की, देशातील एमएसएमई (Micro Small and Medium Enterprises) उद्योगांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने ३ लाख कोटी रुपयांची योजना तयार केली. “आमच्या एमएसएमई क्षेत्रासाठी सरकारच्या ३ लाख कोटी रुपयांच्या योजनेमुळे साडेतेरा लाखांहून अधिक एमएसएमई उद्योगांना फायदा झाला आणि १.५ कोटी नोकऱ्या वाचल्या आहेत. आमच्या सरकारने एमएसएमईची व्याख्या बदलली आणि यामुळे या क्षेत्राला मदत झाली”, एसबीआयच्या डेटाचा हवाला देत मोदींनी सांगितले.
हेही वाचा – ‘किसान संपदा’ योजनेत २०२६ पर्यंत वाढ; योजनेंतर्गत ४६०० कोटी वाटप
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत (Aatmnirbhar Bharat) अभियानाअंतर्गत उत्पादनापासून ते सेवा क्षेत्रापर्यंत भारत जागतिक मूल्य साखळीचा भाग बनत आहे. एमएसएमई आणि सर्वात जास्त मनुष्यबळ असलेल्या वस्त्रोद्योग क्षेत्रावर (Textile Industry) आम्ही लक्ष केंद्रीत केल्याचे मोदींनी सांगितले. भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणारी होती आणि जगाने देशाच्या आर्थिक प्रगतीची दखल घेतली आहे, मोदी म्हणाले.
हेही वाचा – आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार तेजीत
देशाच्या निर्यातीत (India’s Export) झालेल्या वाढीकडे लक्ष वेधताना कृषी, (Agriculture) मोबाईल, (Mobile) सॉफ्टवेअर आणि संरक्षण (Defence) यासह विविध क्षेत्रात भारताने सर्वाधिक निर्यात नोंदवल्याचेही मोदी म्हणाले. संरक्षण निर्यातीतही (Defence Export) भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशाच्या आत्मनिर्भर भारत या दूरदृष्टीमुळेच हे घडले आहे. कोरोनासारखी महामारी असतानाही भारताच्या एकूण निर्यातीने विक्रमी टप्पा गाठला आहे, असे मोदी म्हणाले.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.