[ad_1]
पुणेः सरकारने यंदा विक्रमी हरभरा (Chana) उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मात्र जाणकारांच्या मते देशात ८५ ते ९५ लाख टनांच्या दरम्यानच उत्पादन (Production) होईल. सध्या आयात, नाफेडची विक्री आणि नवीन मालाची आवक, यामुळे बाजारात (Market) हरभरा दर ५ हजारांच्या आताच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडला (NAFED) हमीभावाने हरभरा विकावा. तसेच खुल्या बाजारात तीन महिन्यानंतर दर हमीभावाऐवढे राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
सरकारने कडधान्याची आयात मोकळी केली. परिणामी देशात मोठी आयात झाली. त्यामुळे खरिपातील तूर, मूग आणि उडदाचे दर हमीभावापेक्षा कमी होते. बाजारातील दर आणि आयात पाहून रब्बी हंगामात शेतकरी कडधान्याची कमी लागवड करतील, असा अंदाज बांधला जात होता. परंतु हा अंदाज हरभऱ्याने चुकवला. रब्बी हंगामात हरभरा लागवड ४ टक्क्यांनी वाढली. मागील हंगामात ११० लाख हेक्टरवर हरभरा होता. यंदा ११५ लाख हेक्टरवर पेरा झाला. तसं पाहिलं तर देशातील सरासरी क्षेत्र ९६ लाख हेक्टरच आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत हरभरा जवळपास २० टक्क्यांनी विस्तारला. मागील पाच वर्षांतील सरासरीचा विचार करता लागवड यंदा १० टक्क्यांनी वाढली. याचाच अर्थ असा की, यंदा देशात विक्रमी हरभरा लागवड झाली.
हेही वाचा; आता कापूस आयात करण्याची मागणी !
महाराष्ट्राने यंदा हरभरा लागवडीत बाजी मारली. एकट्या महाराष्ट्रात लागवड ९ टक्क्यांनी वाढली. राज्यात २७ लाख हेक्टरवर हरभरा डोलतोय. केवळ क्षेत्रवाढच विचारात घेतली तर गुजरामध्ये सर्वाधिक ३४ टक्क्यांनी पेरा वाढला. येथे हरभरा क्षेत्र ८ लाख हेक्टरवरून थे ११ लाख हेक्टरवर पोचले. मध्य प्रदेशात २५ लाख हेक्टरवर लागवड झाली. मध्य प्रदेशातही पेरणी काहीशी वाढली. मात्र राजस्थान आणि कर्नाटकात यंदा हरभरा लागवड माघारली. राजस्थानमध्ये २० लाख हेक्टर आणि कर्नाटकात ११ लाख हेक्टरवर पीक आहे.
देशातील हरभरा उत्पादनाची स्थिती लक्षात घेता, शेतकऱ्यांनी थोडा संयम ठेऊन हमीभावानेच विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले. सरकारने सांगितल्याप्रमाणे विक्रमी उत्पादन यंदा होणारन नाही. त्यामुळे जून किंवा जुलै महिन्यात हरभरा खुल्या बाजारात हमीभावापर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विकावा, असे आवाहनही जाणकारांनी केले.
व्हिडिओ पाहा.
उत्पादनाचा अंदाज
देशातील लागवड विचारात घेता सरकारने यंदा १३१ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मागील वर्षी ११५ लाख टन उत्पादन होते. मात्र जाणकार आणि उद्योगाला सरकारचा हा अंदाज मान्य नाही. जाणकारांच्या मते यंदा ८५ ते ९५ लाख टनांपर्यंत हरभरा उत्पादन होईल. प्रतिकूल हवामान आणि झालेला पाऊस, यामुळे उत्पादन घटेल, असे त्यांनी सांगितले. म्हणजेच उद्योग आणि सरकार यांच्या अंदाजात तब्बल मोठा फरक आहे. असे असले तरी सध्या बाजारात हरभरा दबावात आहे. सरकराने यंदा हरभऱ्याला ५ हजार २३० रुपये हमीभाव जाहिर केला. मात्र बाजारातील दर ४ हजार २०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे शेतकरी हमीभावाने हरभार विक्रीला पसंती देत आहेत.
नाफेडची खरेदी
नाफेड यंदा हरभऱ्याची १५ लाख टन खरेदी करेल, असे जाणकारांनी सांगितले. यापैकी महाराष्ट्रात ६ लाख ८० हजार टनांची खरेदी होणार आहे. त्यातच सध्या नाफेडकडे केवळ १७ लाख टनांचा साठा असल्याचे जाणकारांनी सांगितले. तर नाफेडकडे २१ लाख टन कडधान्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे रब्बीत नाफेडची खरेदी वाढेल, अशी शक्यता आहे. देशात आत्तापर्यंत हमीभावाने २ लाख १० हजार टन हरभरा खरेदी झाली. हमीभावाने खरेदीत गुजरात आघाडीवर आहे. गुजरातमध्ये आत्तापर्यंत १ लाख १० हजार टन खेरदी झाली. तर महाराष्ट्रात ८६ हजार टन हरभरा शेतकऱ्यांकडून खरेदी झाला. तसेच कर्नाटकातील खरेदी २० हजार टनांवर पोचली. बाजारात दर कमी असल्याने यंदा नाफेडची हरभरा खरेदी वेगाने सुरु आहे.
देशात यंदा ८५ लाख टनांच्या दरम्यान उत्पादन होण्याचा अंदाज आहे. पाऊस आणि उष्णतेचा पिकाच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे पीक कमीच राहिल. आता लग्न-समारंभ सुरु झाले. त्यातच हाॅटेल्स, रेस्टाॅरंट्सही पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. या क्षेत्रातून हरभऱ्याला मागणी राहिल.
– दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार अभ्यासक
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.