Cilantro Farming Tips in Marathi – भारतातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोथिंबीरीची लागवड केली जाते. विशिष्ट स्वादयुक्त पानांमुळे वर्षभर कोथिंबीरीला मागणी असते. मुख्यत्वेकरून खरीप व रब्बी हंगामात कोथिंबीरीची लागवड केली जाते. उन्हाळी हंगामात कोथिंबीरीला मागणी भरपूर असते. त्यामुळे कोथिंबीरीच्या लागवडीस चांगला वाव असतो.
लागवडीसाठी हवामान आणि जमीन :
कोथिंबीरीची लागवड कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते, त्यामुळे अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबीरीची लागवड करता येते. उन्हाळ्यात तापमान 36 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास कोथिंबीरीची वाढ कमी होते. कोथिंबीरीसाठी मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमीन चांगली. हलक्या तसेच भारी जमिनीत सेंद्रिय खते विपुल प्रमाणात असल्यास कोथिंबीरीचे पिक चांगले येते.
लागवडीसाठी योग्य हंगाम :
कोथिंबीरीची खरीप, रब्बी, उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड केली जाते. मात्र कोथिंबीरीचे उत्पादन हे एप्रिल ते मे महिन्याच्या दरम्यान घेतलेले उत्तम समजले जाते.
खते आणि पाण्याचे नियोजन :
कोथिंबीरीच्या चांगल्या, जोमदार वाढीसाठी बी पेरताना हेक्टरी 35 ते 40 गाड्या शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीच्या वेळी कोथिंबीरीच्या पिकाला 15-5-5 हे मिश्रखत 50 किलो द्यावे. हेक्टरी 40 किलो नत्र बी उगवल्यावर 20 ते 25 दिवसांनी द्यावे. हेक्टरी 40 किलो नत्र कोथिंबीरीचा खोडवा घ्यायचा असेल तर कापणीनंतर द्यावे. कोथिंबीरीला नियमित पाणी देणे आवश्यक आहे. सुरूवातीच्या काळात बियांची उगवण होण्यापूर्वी वाफ्याला पाणी देताना वाफ्याच्या कडेने वाळलेले गवत किंवा उसाचे पाचट लावावे.
किड व रोग निवारण :
कोथिंबीरीवर फार रोग, किड दिसून येत नाही. कधीतरी मर रोगाचा प्रार्दूभाव होतो. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी लांम सी एस-6 सारख्या भुरी प्रतिबंधक जातीचा वापर करा. पाण्यात विरघळणारे गंधक वापरा.
कोथिंबिरीची काढणी :
पेरणीपासून 2 महिन्यांनी कोथिंबीरीला फुले येण्यास सुरुवात होते. त्यापूर्वी हिरवीगार, कोवळी लुसलुशीत असताना कोथिंबीरीची काढणी करावी. फुले येण्यापूर्वी कोथिंबीर साधारणपणे 15 ते 20 सेमी उंच वाढलेली कापून किंवा उपटून काढावी. कोथिंबीरीचे हेक्टरी 6 ते 8 टन उत्पन्न हे उन्हाळी हंगामात मिळते तर 10-15 टन उत्पन्न हे पावसाळी व हिवाळी हंगामात मिळते.
[ad_2]
आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.