महाराष्ट्रामध्ये थंडीची लहर असे न केल्यास होईल कहर...घ्या पिकाची काळजी ! - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

महाराष्ट्रामध्ये थंडीची लहर असे न केल्यास होईल कहर…घ्या पिकाची काळजी !

0
5/5 - (1 vote)

मुंबई 25 व 26 तारखेप्रमाणेच 27 तारखेला ही शीतलहरीचा प्रभाव हवामानामध्ये टिकून राहील अशा वेळेस पिकांची काळजी करणे खूप गरजेचे आहे मराठवाड्यामधील काही भागांमध्ये शीतलहरीचा परिणाम पिकावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्यासाठी या पिकांची काळजी कशाप्रकारे करावी याबाबतची माहिती मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ञांकडून शेतकऱ्यांसाठी देण्यात आली आहे तर आपण जाणून घेऊया….

पीक व्यवस्थापन हे प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे असतात .त्याचप्रमाणे प्रत्येक पिकाची काळजी ही वेगवेगळ्या प्रकारे घ्यावी लागते .त्यासाठी खाली प्रत्येक पिकाबद्दल काही महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत .त्या जाणून घेऊन त्याप्रमाणे काळजी घेतल्यास आपल्या पिकावर हवामान बदलांचा परिणाम कमी होईल आणि उत्पादनामध्ये हि फायदा होईल.

पिकांची काळजी कशी घ्यावी ?

तुर : काढणीस योग्य असलेली तुर काढून ती सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी .त्यानंतर जि तुर काढणीस योग्य नाही अशा तुरीवर हवामान बदलाचा परिणाम होऊ शकतो.

कापूस : अधिक मालाच्या लालसेपोटी शेतकरी कापसाची फरदड घेतो पण कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड खोडवा घेऊ नये. कारण याचा परिणाम पुढील पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो .कापूस पिकास 180 दिवस झाले असल्यास पिकाची शेवटची वेचणी पूर्ण करून, पालापाचोळा ,पराठ्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी .हेच पिकाच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे आहे.

रब्बी ज्वारी :ढगाळ वातावरणामुळे रब्बी ज्वारी पिकावर खोडकिडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याच्या व्यवस्थापनासाठी थिओमीटज़म 12.6 + लमाड हायहॅलोतीन 9.5 ml आणि झेडसी पाच ml याप्रमाणे प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला पिकाचे व्यवस्थापन :

तापमानामध्ये घट होऊन ढगाळ वातावरण यामुळे तुरळक ठिकाणी शीतलहरीचा ची शक्यता दिसून येत आहे .भाजीपाला पिकाची थंडीपासून संरक्षण करण्यासाठी भाजीपाला पिकाला संध्याकाळी पाणी द्यावे. ढगाळ वातावरणामुळे पिकावर फुलकिडे शेंडा ,पोखरणारी अळी, याप्रकारे कीडीचा प्रादुर्भाव दिसून येईल त्यामुळे योग्य ती फवारणी करावी. अथवा त्यांच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी दोन कामगंध सापळे लावावेत. या सर्वांमुळे भाजीपाला पिकाचे नुकसानाची तीव्रता कमी होईल.

फुलशेतीचे व्यवस्थापन :


काढणीस तयार असलेले शेवंती, निशिगंध ,ग्लॅडिओलस ,फुल पिकांची काढणी करून घ्यावी .किमान तापमानात घट होऊन शीतलहर येण्याची शक्यता असल्यामुळे फुल पिकाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी फुल पिकास सायंकाळच्या वेळी पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे.

फळबाग यांचे व्यवस्थापन :

थंडीचा कहर पासून वाचवण्यासाठी फळ बागेचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक फळाचे व्यवस्थापन हे वेगवेगळे आहे .आंबा पिकाचे व्यवस्थापन म्हणजे सध्या आंबा मोहर वर आलेला आहे. त्यामुळे आंबा मोहर रक्षणासाठी 300 मेश गंधकाची यांची धुरळणी करावी म्हणजे भुरी व करपा रोगापासून बागेचे संरक्षण होईल .आंब्याच्या मोहरा वरील तुडतुडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 15 मिली किंवा प्रोफेशनल पंचवीस पर्सेंट म्हणजे स्वीस मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .द्राक्ष फळबाग बद्दल सांगायचं झाल्यास सध्या द्राक्ष बागेमध्ये मण्यांची क्रॅकिंग होऊ शकते. द्राक्ष बागेतील मणी तडकू नयेत. म्हणून द्राक्ष बागेमध्ये पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करावे. त्याच बरोबर बागेभोवती कृत्रिम बारा रोधकाचे व्यवस्था करावी .द्राक्षांचे घड जिब्रेलिक एसिड ट्वेन्टी पीपीएम च्या द्रावणात बुडवून फायद्याचे ठरेल. केळी फळबाग बद्दल व्यवस्थापनासाठी फळबागांमध्ये मोकाट पाणी द्यावे .
या सर्व वरील उपाय योजनेमुळे फळबाग यांचे होणारे नुकसान टाळता येईल.

Tags :
Pik vavasthapan, sheti news, marathwada krushi vidyapith,hawaman badalanche parinam,

Share via
Copy link