Cotton Crop Care । या अमावास्येला कपाशी फवारणी करा, अन बोंडअळी पासून नियंत्रण मिळवा
बोन्ड अळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे | Gulabi Bondali Niyantran
Gulabi Bondali Niyantran : गुलाबी बोन्डअळीचे पतंग जे एक पतंग किमान अंदाजे १८० ते २०० अंडी घालते. त्याचे नियंत्रण करण्यासाठी किंवा त्याचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झाला आहे. हे जाणुन घेण्यासाठी कामगंध सापळे कपाशीच्या झाडाच्या दीड ते दोन फुट उंचीवर एकरी 6 ते 8 , शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावावे.
पण कामगंध सापल्यामुळे सेंद्री अळी नियंत्रित होईलच असे नाही .हे पतंग पाऊस पडल्यावर कोषातून बाहेर येतात व त्यांचे आयूर्मान 2 महिने असते, त्या 2 महिन्याच्या काळात ज्या अमावश्या येतात त्या त्या वेळी ते अंडी घालतात.
आपण कापूस लागवड केल्यानंतर मशागत करतो व जमिनीत गाडल्या गेलेले कोष पुन्हा बाहेर येतात, व ते पुढे 2 महिने , असे चक्र चालूच राहते, हे पतंग 1 ते दीड किलोमीटर पर्यन्त उडू शकतात, आणि कापसाचे जे पीक लुसलुशीत दिसते त्यावर अंडी घालतात.
ह्या वर्षी तरी सर्व शेतकऱ्यांनी ह्या दोन दिवसात आपल्या शेतात एकरी 6/8 कामगंध सापळे लावावेत*.व 30 दिवसांनी त्यातील ल्युर बदलावी
दोन गोष्टी करा, मार्ग निघेल
- कापुस पिकाला युरिया हे खत जास्त देऊ नका युरियामुळे पीक लुसलुशीत होते,म्हणजे एक प्रकारे ते माजावर येते, आणि जास्त प्रमाणात रोग ,किळ,अळी पिकावर पडतात.
- मोनोक्रोटोफास , तसेच असिफेट +इमिडा सारखे औषधी फवारणी आलटून पालटून करावी जास्त मोनो फवारणी करू नये, नियोनिकोटींन गटातील कीटकनाशके पुन्हा पुन्हा फवारू नका त्यामुळे किडींची प्रतिकार क्षमता वाढते व पुढे कापूस मोठा झाल्यावर या किडीवर नियंत्रण मिळवणे कठीन होते.
मोनोक्रोटोफॉस ,असीफेट+इमिडा यांची कापूस पिकावर फवारणी केल्यामुळे झाडांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते ,व पीक रोगाला लवकर बळी पडते ,तसेच लुसलुसीत कापसावर गुलाबी बोंड अळीचा पतंग लवकर आकर्षित होतो.व तेथे अंडी घालतो.
कापुस फुल अवस्थेमधें आल्यानंतर म्हणजेच 55 ते 60 दिवसाचा झाल्यावर योग्य ती व योग्य प्रमाणात फवारणी करावी चांगल्या प्रकारे गुलाबी अळीवर नियंत्रण मिळेल.
अमावश्या आणि अळी
मित्रानो, कापूस या पिकावर अळी पडण्याचा कालावधी हा ठरलेला असतो, आणि तो म्हणजे अमावश्या सर्व सजीव श्रुष्टीचा मीलन आणि फलन काळ हा अमावस्या असतो, प्रत्येक महिन्याच्या अमावाश्येला एक दोन दिवस मागे पुढे, म्हणजे महिन्याच्या ज्या 4/5 काळ्याकुट्ट रात्री असतात, त्या रात्री अळीचे पतंग अंडी घालतात, हि अंडी पिकांच्या लुसलुशीत पानावर ,पातीच्या देठावर घालतात, हि अंडी साधारणतः 48 ते 72 तासात उबवतात
{ते तापमानावर अवलंबुन असते, तापमान कमी असेल ,तर 4 दिवसात हि उबवतात}
त्यातून अतिशय सूक्ष्म अळी जन्माला येते ती साध्या डोळ्यांनी दिसत नाही इतकी सूक्ष्म असते, ती प्रथम फुलात जाते व एक दोन दिवसांनी फुलांच्या पाकळ्या आतून वळतात फुलांचा रंग फिकट जांभळट होतो , तीच डोमकली तयार होते. 2/4 दिवसात हि अळी फुलांच्या आत असलेल्या लहान कैरीच्या आत जाते, कैरीच्या आत गेल्यावर तिची संपूर्ण अवस्था तेथेच पूर्ण होते.
अळी ज्या मार्गाने कैरी गेलेली असते तो मार्ग अळीचा विस्टमुळे ,कैरीच्या वाढीमुळे बंद होतो व आपल्याला माहितीहि पडत नाही की कैरीत अळी आहे ते.आणि म्हणूनच या अळी ला कोणतेही किटकनाशक मारू शकत नाही, तुम्ही ती कैरी रात्रभर किळनाशकात बुडवून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी फोडून पहिली तरी ,ती अळी जीवन्त सापडेल. या सेंद्री अळीचे आयुर्मान 35 दिवसाचे असू शकते.
मित्रानो आपण ह्या अळीला मारू शकत नाही, हिच्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर , आमवेश्येच्या आदल्या दिवशी निमार्क 10000 पीपीएम 15/20 मिली व स्प्रेडर 5/7 अशी फवारणी करावी, अमावस्येच्या 2 दिवसांनी अंडीनाशक फवारणी करणे, किंवा ती अति सूक्ष्म अवस्थेत पण कैरीच्या आत जाण्याच्या अगोदरच अळी नाशक फवारा मारने.
सेंद्रीवर अळी वर उपाय
अळी कैरीत गेल्यामुळे आपण तिला मारू शकत नाही, आपल्या हातात फक्त अंडी नासवणे आणि प्राथमिक अवस्तेतील अळी(बारीक) मारणे हेच उपाय शिल्लक राहतात.अमावस्ये नंतर चे 4 दिवस त्यासाठी महत्वाचे असतात, आणि या 4 दिवसात जर आपण योग्य ती आणि योग्य प्रमाणात किटकनाशक फवारणी केली तर 90% सेंद्री अळी चे नियंत्रण करू शकतो.
उपाय
आमवेश्येच्या आदल्या दिवशी निमार्क व स्प्रेडर चा फवारणी करावी.
अमावस्येच्या 2/3 दिवसांनी खालील फवारणी करावी.प्रमाण 15 लिटर पाण्यासाठी आहे.
खालील कोणतीही एक फवारणी करावी.
{1} थोयोडीकार्ब 20 ग्रॅम ,
नीम अर्क 10000 15/20 मिली स्प्रेडर 5/7 मिली,
प्रोफेनोफॉस 40 मिली.
{2} इमामेकटींन बेंझोइत10 ग्रॅम,
स्प्रेडर 5/7 मिली,
निमार्क 15/20 मिली
सुपर प्रोफेक्स 40 मिली.
{3} प्रोफेनोफॉस 40 मिली
डेसिस 25 मिली
नीम अर्क 15/20 मिली
स्टिकर 5 मिली
वरील प्रमाणे अमावस्ये नंतर 1 फवारणी केल्यावर 8 ते 10 दिवसांनी दुसरी फवारणी करावी
त्यात खालील 2 पैकी कोणतीही एक फवारणी करावी.
{1} थोयोडी कार्ब 30 ग्रॅम, क्लोरो 50% 35 मिली,
नीम अर्क 15/20 मिली ,
स्प्रेडर 5/7 मिली.
{2} डायपेल 50 ते60 मिली
क्लोरो 50%चे 35 मिली
निम अर्क 15/20 मिली,
स्प्रेडर 5/7 मिली.
{3}डेसिस 25 मिली
नुवान 35 मिली
निमार्क 15/20 मिली
स्प्रेडर 5 मिली
टीप – कोणत्याही परिस्थितीत प्रोफेनोफॉस, क्लोरोपायरीफॉस, लगातार 2 वेळा फवारू नका त्यामुळे कापूस पिकाची पाने पिवळी पडून पानगळ होते.
वरील फवारणीचा परिणाम
प्रोफेनोफॉस अळी व अंडी नाशक असल्यामुळे प्राथमिक अवस्तेतील अळी मरेल अंडी नासल्यामुळे अळी अंड्यातून बाहेर येणार नाही.नीम अर्कात ऍझोडीरेकटींन हा घटक अंडी नाशक आहे, अंडी नासतील , नीम अर्काचा तीव्र कडू वासा मूळे पतंग अंडी आपल्या शेतात घालणार नाहीत ,भुकेने व्याकुळ होऊन अली मरेल.
स्प्रेडर हे अत्यन्त पॉवर फुल पेनेट्रेट होणारे सिलिकॉन स्प्रेडर आहे , पानावर किटकनाशक पडले तरी ते संपूर्ण पानात भिनले जाईल, इमामेकटींन,प्रोफेनोफॉस, सायपरमेथ्रीन थोयोडी कर्ब, हे जहाल विष आहे ,क्लोरो आणि नुवान धुरीजन्य असल्यामुळे पात्यात असलेली अळीही मरेल अळीचा खात्मा होईल.
सिन्थेटिक पायरेथ्रीड औषधाचा, वापर केल्यामुळे पिकाला शॉक बसतो, तसेच चिकटा पडू शकतो, व पांढऱ्या माशीचे प्रमाण वाढू शकते.ती मारल्यानंतर एखादे टॉनिक ची फवारणी आवस्यक असते.
आमावस्ये नंतर हे 2 फवारे मारल्या नंतर 15/20 दिवस फवारणी करावी लागणार नाही, पण तो पर्यंत पुढची आमावस्या येईल, मग पुन्हा वरील प्रमाणेच करावे लागेल.
धन्यवाद 🙏🙏
सौजन्य – कु. अनिकेत शेळके (पिक सल्लागार, बी.टेक एग्रीकल्चर)