Cotton import increasing in India


 

पुणे ः भारतातून यंदा चालू विपणन वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत कापूस आयात वाढली मात्र निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक झालीये. तसेच सूत (Yarn) आणि कापड निर्यातही (Fabric export) यंदा अधिक झाल्याचे अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने (USDA) म्हटले आहे. 

भारतातून २०२०-२१ च्या विपणन वर्षात ७९ लाख २६ हाजर ९४८ गाठी कापूस निर्यात झाली. तर २०१९-२० मध्ये ४१ लाख ३४३ गाठी कापूस विदेशात पाठविण्यात आला. याचाच अर्थ असा की मागील हंगामात कापूस निर्यात (cotton export) दुप्पट झाली. परंतु चालू विपणन वर्षात सुरुवातीपासूनच स्थानिक बाजारात कापसाचे दर चढे असल्याने कापूस निर्यातीची ही गती कायम राहिली नाही.

चालू विपणन वर्षात ऑगस्ट महिन्यात केवळ ३ लाख ४४ हजार गाठी कापसाची निर्यात झाली, तर मागील वर्षी याच काळात ३ लाख ३९ हजार गाठी कापूस निर्यात झाली होती. सप्टेंबरमध्ये यंदा २ लाख ७५ हजार गाठी कापूस विदेशात गेला तर मागील सप्टेंबरमध्ये ४ लाख ४८ हजार गाठी कापूस विदेशात पाठवला गेला. ऑक्टोबर महिन्याचा विचार करता यंदा २ लाख ५१ हजार निर्यात झाली तर गेल्यावर्षी ५ लाख २९ हजार गाठी कापसाची निर्यात झाली होती. नोव्हेंबरमध्ये यंदा काहीशी निर्यात वाढून ६ लाख ७६ हजार गाठींवर पोचली. तर मागील वर्षी याच महिन्यातील निर्यात ७ लाख ८२ हजार गाठींवर होती.

हे ही वाचाः सरकारी धोरणामुळे साखर उद्योग क्षेत्राला दिलासा

चालू वर्षात देशातून कापूस निर्यात घटली असली तरी आयात मात्र वाढली आहे. युएसडीएच्या मते २०१९-२० च्या विपणन वर्षात कापसाची २९ लाख २० हजार गाठींची आयात झाली होती. तर २०२०-२१ मध्ये कापूस आयात निम्म्यावर येऊन १० लाख ८० हजार गाठींवर पोचली होती. परंतु यंदा पहिल्या चार महिन्यांतच कापूस आयात वाढली. ऑगस्ट महिन्यात ७८ हजार गाठी कापूस आयात झाली. तर सप्टेंबरमध्ये ९२ हजार गाठी, ऑक्टोबरमध्ये ८१ हजार आणि नोव्हेंबरमध्ये ६८ हजार गाठी कापूस देशात दाखल झाला. मागील वर्षी ऑगस्टमध्ये ६० हजार गाठी, सप्टेंबरमध्ये ८८ हजार, ऑक्टोबरमध्ये ६२ हजार आणि नोव्हेंबरमध्ये ४२ हजार गाठी कापसाची आयात झाली होती. म्हणजेच यंदा कापूस आयात वाढली आहे.

देशातून यंदा सूत निर्यातीतही वाढ झाली आहे. २०१९-२० मध्ये देशातून ९ लाख २९ हजार टन सूत निर्यात झाली होती. तर २०२०-२१ मध्ये ११ लाख ३५ हजार टनांपर्यंत निर्यात पोचली. म्हणजेच गेल्या हंगामात प्रत्येक महिन्याला सरासरी एक लाख टन निर्यात होती. मात्र चालू वर्षात निर्यात एक लाख टनांपेक्षा अधिक होत आहे. 

हंगामातील पहिल्या चार महिन्यांचा विचार करता सूत निर्यात वाढल्याचे दिसते. यंदाच्या ऑगस्टमध्ये सूत निर्यात १.१६ लाख टन झाली ती मागील हंगामात ऑगस्टमध्ये ९२ हजार टन होती. तसेच सप्टेंबरमधील निर्यात यंदा १.१७ लाख टन, तर गेल्या वर्षी याच काळात ९३ हजार टन होती. ऑक्टोबरचा विचार करता यंदा १.१७ लाख टन तर गेल्यावर्षी ८६ हजार टन निर्यात झाली. नोव्हेंबरमध्ये यंदा १.१९ लाख टन तर गेल्या वर्षी ८७ हजार टन सूत निर्यात झाली होती.

यंदा कापड निर्यातीततही वाढ झाली आहे. २०१९-२० मध्ये १४८.९३ चौरस मीटर कापसाची निर्यात झाली होती. तर २०२०-२१ च्या विपणन वर्षात कापड निर्यात ५०१ चौरस मीटरवर पोचली होती. यंदा ऑगस्ट महिन्यात २०.९५ चौरस मीटर कापडाची निर्यात झाली. सप्टेंबरमध्ये ३७.४९ चौरस मीटर तर ऑक्टोबर महिन्यात ३७.४९ चौरस मीटर कापडाची भारतातून निर्यात झाली, असे युएसडीएने म्हटलं आहे.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment