Crop Insurrance Claim 2022 : नमस्कार मित्रांनो,मित्रांनो अखेर प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 अंतर्गत पिक विमा भरलेल्या व विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान ग्रस्त झालेल्या त्याच्या मध्ये अतिवृष्टी,कीड रोगाचा प्रादुर्भाव,काढणीपश्चात नुकसान अशाप्रकारे प्रादुर्भाव आणि नुकसान ग्रस्त झालेल्या बाधित झालेल्या आणि या नुकसानीसाठी पीक विम्याचा क्लेम केलेले शेतकऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांचे दावे मंजूर करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचं अपडेट अशाच प्रकारचा स्पष्टीकरण राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले. या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा : Shet Rasta Kayda | शेतरस्ता हवा असेल तर मग जाणून घ्या शेतरस्ता कायदा
मित्रांनो आपण जर पाहिले तर 2022 मध्ये शेतकऱ्यांचा अतिवृष्टी याप्रमाणे गॉगल गाय इतर कीड रोगाचा प्रादुर्भाव येलोमोजॅक असेल किंवा काढणीनंतर झालेला पाऊस,यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. याचबरोबर काही जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड देखील पडलेला होता आणि याच कारणासाठी शेतकऱ्यांच्या मनातून आपल्या पिक विमा नुकसान भरपाईसाठी दावे दाखल करण्यात आले. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार दावा असेल किंवा आपल्या भागांमध्ये अशा प्रकारचे नुकसान झाले नाही अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती आढळून आले नाही अशी कारणे सांगून त्या शेतकऱ्यांचे दावे बाद करण्यात आले होते. त्या अपात्र झालेल्या शेतकर्यांचे याद्या प्रकाशित करण्यात आलेली होती.
पीक विमा निर्णय
मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर विविध वर्तमानपत्रांच्या माध्यमातून टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आवाज उठविण्यात आला होता. शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आक्रोश होता आणि याच पार्श्वभूमीवर ती सर्व पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी अधिकारी आणि कृषी मंत्रालयाचे अधिकारी याचबरोबर स्वतः कृषी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली होती. याच्या वरती बऱ्याच साऱ्या चर्चा घडवण्यात आल्या होत्या. पीक विम्याचे वाटप सह संदर्भ स्पष्टीकरण निर्देश देण्यात आलेले होते.
याच वेळी आयुक्तांच्या माध्यमातून पिक विमा कंपन्याला देखील जाब विचारण्यात आला की कुठल्या बेस वरती शेतकऱ्यांचे दावे अपात्र करण्यात आलेले. त्याच्याबद्दलचा स्पष्टीकरण मागण्यात आलं आणि या वेळेस सर्व पिक विमा कंपनीच्या माध्यमातून अशा प्रकारचे कुठलेही दावे आपल्या माध्यमातून बाद करण्यात आलेले नाहीत अशा प्रकारचे माहिती देण्यात आलेली आहे.
हे पण वाचा : Samaj Kalyan Yojna | गणवेश, बूट साठी या विद्यार्थ्यांच्या खात्यात अनुदान
पिक विमा कंपनीकडून माहिती
पिक विमा कंपनीच्या माध्यमातून शासनाला देण्यात आलेल्या माहितीमध्ये साधारणपणे राज्यांमध्ये 51 लाख 78 हजार 329 एवढे दावे शेतकऱ्यांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने ऑफलाइन पद्धतीने केले असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. याच्यापैकी 49 लाख 92 हजार 936 एवढे द्यावे पिक विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वेक्षण करून मंजूर करण्यात आलेले आहेत. अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे. मात्र याच्या व्यतिरिक्त एक लाख 85 हजार 392 शेतकऱ्यांचे दावे मात्र दुबार नाव किंवा दुबार दावा आलेला असल्यामुळे,ते अद्याप देखील पेंडिंग मध्ये आहेत. त्यांचा जो दावा ऑलरेडी मंजूर केलेला असेल तर हा दुबार दावा त्या ठिकाणी अपात्र केला जाईल अशा प्रकारची माहिती या पिक विमा कंपनीच्या माध्यमातून शासनाला देण्यात आलेली आहे.
सर्वांचे दावे मंजूर
अश्या या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप तात्काळ करावं अशा प्रकारच्या आदेशसुद्धा कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे ऑफलाइन पद्धतीने ऑनलाइन पद्धतीने दावा केलेल्या आणि दावा नामंजूर झालेल्या दावा अपात्र झालेल्या अशा प्रकारचे मेसेज आलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सर्वच्या सर्व दावे यांच्या अंतर्गत केलेले पूर्णच्या पूर्ण दावे मंजूर केले जाणार आहेत.
हे पण वाचा : कृषी ड्रोन योजना 2022 काय आहे? अनुदान| प्रशिक्षण| ठरवलेल्या अटी
मित्रांनो याचप्रमाणे परतीच्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात राज्यांमध्ये नुकसान झालेले होते. ज्याच्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शासनाला प्रस्ताव पाठवले आहेत. त्याच्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मिळून 27 लाख हेक्टर क्षेत्र बाधित दाखवण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये परतीचा पाऊस आहे किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा नुकसान आहे.याच्यासाठी साधारणपणे राज्य शासनाच्या माध्यमातून 2500 कोटी पेक्षा जास्त निधीची तरतूद केली जाऊ शकते.
त्याच्यासंबंधी घोषणा केली जाऊ शकते,परंतु राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती मदत कशा प्रकारे जाहीर केली जाते कशी वितरित केले जाते हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. याच्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याच्यावर देखील चर्चा करून त्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्री करतील अशा प्रकारची माहिती सुद्धा कृषि मंत्रीच्या माध्यमातून स्पष्टीकरण देऊन देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आता या स्पष्टीकरणामुळे या पिक विमा कंपनीच्या माहितीमुळे कुठेतरी कमी होणार आहे आणि याच्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी देखील मदत होणार आहे.