[ad_1]
पोर्ट ब्लेअर ः अंदमान समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली असून काही तासांत त्याची तीव्रता आणखी कमी होऊन तो म्यानमारमधील थंडवे बंदराची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता हवामान (weather) विभागाने वर्तविली आहे.
हेही वाचा- दूध आणि मांस उत्पादनासाठी पाळा ही शेळी
मात्र, संभाव्य ‘असनी’ चक्रीवादळाचा (cyclone) धोका टळण्याची शक्यता आहे. गेले दोन दिवस मुसळधार पावसाचा सामना केल्यानंतर मंगळवारी मुसळधार पावसाची शक्यता नसल्याने अंदमानने सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, जोरदार वाऱ्यांचा इशारा हवामान खात्याने दिला.
हेही वाचा- मुरघास बनविण्यासाठी कोणत्या पिकांचा वापर कधी करावा ?
अंदमान (andman) आणि निकोबार (nicobar) बेटांजवळ तसेच पूर्व-मध्य बंगालचा उपसागर व उत्तर अंदमान समुद्रात उद्यापर्यंत (ता.२३) प्रतितास ६५ ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वाऱ्यांचा वेग प्रतितास ८५ किलोमीटरपर्यंतही पोचू शकतो. त्यानंतर, मात्र, या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन म्यानमारच्या किनाऱ्यासह पूर्व-मध्य बंगालचा उपसागर व उत्तर अंदमान समुद्रात प्रतितास ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हेही वाचा- जनावरांमधील क्षयरोगामध्ये कोणती लक्षणे दिसतात?
चक्रीवादळाचा धोका टळणार असला तरी समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांना (fishers) समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवरील पर्यटनही सध्या बंद असेल.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.