जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान, कोणते शेतकरी असतील यासाठी पात्र? land record
स्वाभिमान योजना अटी व पात्रता
- योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचे किमान वय 18 व कमाल वय 60 वर्षे निश्चित केले आहे.
- लाभार्थी हा भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा.
- परित्यक्ता, विधवा स्त्री यांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात येते.
- महसूल व वन विभागाने ज्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे, त्या कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येत नाही.
- यापूर्वी लाभ दिलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरीत करता येत नाही. तसेच विकता येत नाही.
- या कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी 10 वर्षे मुदतीसाठी असणार आहे.
- कर्जफेडीची सुरूवात कर्ज मंजुरीनंतर दोन वर्षांनंतर सुरू होणार आहे.
- कुटूंबाने विहीत मुदतीत कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.
- संबंधित लाभधारकाने जमीन स्वत: कसणे आवश्यक असून तसा करारनामा देणे बंधनकारक आहे.
- जमीन खरेदी करताना प्रती एकरी तीन लाख रूपये एवढ्या कमाल मर्यादेपर्यंत चर्चेद्वारे खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समितीस देण्यात आलेली आहे.
- सन 2017-18 मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजुरांना जमीन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 18 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान
दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना अर्जासाठी लागणारी कागदपत्रे
- अर्ज विहीत नमुन्यात पासपोर्ट फोटो सह भरावा.
- अर्जदाराने अनुसूचित जाती या प्रवर्गातील असल्याबाबत जातीचे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले विहीत प्रमाणपत्र
- रहिवाशी दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, निवडणूक कार्ड प्रत
- भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला.
- मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला.
- वय 60 वर्षांखालील असल्याचा वयाचा दाखला किंवा पुरावा.
- लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबत विहीत प्रमाणपत्र.
- शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्यांचा 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र.
‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान