[ad_1]
नुकताच वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२१ (World Air Quality Report 2021) जाहीर करण्यात आलाय, या रिपोर्टनुसार मोकळा श्वास घ्यायला आता जागाच उरलेली नाही. प्रदूषणाचा विचार करता कोणत्याच देशातील कोणतेच शहर सध्या सुरक्षित उरले नाही.
हा रिपोर्ट जगातील ११७ देशांमधील ६,४७५ शहरांमधील पीएम २.५ डाटावर आधारित आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मध्य तसेच दक्षिण आशियातील काही शहरांमध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित हवा आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित (Most Polluted) १०० शहरांत भारतातील ६३ शहरांचा समावेश होतो आहे.
हेही वाचा- स्मार्ट शेतीमुळं कसं वाढणार शेतकऱ्यांचं उत्पन्न ?
दिल्ली ही जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी (most polluted capital)बनलीय. प्रदूषणाबाबत बांगला देशाची राजधानी ढाका सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी होण्याचा हा मान दिल्लीला सलग चौथ्यांदा मिळालाय. २०२१ मध्ये मध्य तसेच दक्षिण आशियाच्या १५ सर्वांत प्रदुषित शहरांमधील १२ शहरे भारतातील होती. आफ्रिकन देश चाडची राजधानी नजामिना तिसऱ्या स्थानावर तर तजाकिस्तानची राजधानी दुशांबे चौथ्या आणि ओमानची राजधानी मस्कत पाचव्या क्रमांकावर आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) एअर क्वालिटी इंडेक्सच्या मानकांनुसार कोणत्याच देशातील कोणतेच शहर सध्या सुरक्षित उरले नाही आहे. तसेच भारतातील कोणतेच शहर डब्ल्यूएचओच्या एक्यूआयच्या गाईडलाईन्सनुसार नाही.
व्हिडीओ पहा-
वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२१ नुसार (World Air Quality Report 2021), गेल्या वर्षी दिल्लीच्या पीएम २.५ मध्ये १४.६ टक्के वाढ झाली होती. दिल्लीमध्ये प्रदूषणाची समस्या खूपच गंभीर बनली आहे. नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये हरियाणा तसेच पंजाबमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जाते, त्यामुळेही प्रदूषण वाढते. प्रदुषणावर योग्य पद्धतीने उपाय न केल्यामुळे देखील सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारवर अनेक वेळा ताशेरे ओढले आहेत.
भिवडी सर्वांत प्रदूषित क्षेत्रीय शहरमध्य तसेच दक्षिण आशिया क्षेत्रातील देशांमध्ये इराण, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगला देशदेखील सामील आहे. राजस्थानमधील भिवडी सर्वाधिक प्रदूषित क्षेत्रीय शहर आहे. हवा प्रदुषण वाढण्यामध्ये पीएम २.५ ची भूमिका सर्वाधिक महत्त्वपूर्ण ठरते. हवेत जर याची मात्र अधिक असेल तर अस्थमा, स्ट्रोक, हृदय आणि फुप्फुससंदर्भातील आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. आरोग्य तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, पीएम २.५ मुळे जगभरातील लाखो लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.