२ दुधाळ जनावरे गाई /म्हशी गट वाटप योजना 2022, असा करा ऑनलाईन अर्ज - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

२ दुधाळ जनावरे गाई /म्हशी गट वाटप योजना 2022, असा करा ऑनलाईन अर्ज

0
4.2/5 - (4 votes)

योजनेचे नाव आहे विशेष केंद्रीय सहाय्य योजना आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदिवासी महिलांना दोन दुधाळ जनावरांचा गट वाटप करणे.
या योजनेअंतर्गत आदिवासी महिलांना दोन दुधाळ जनावरे मिळणार आहेत. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे योजनेचा फॉर्म कसा भरावा? त्यानंतर योजनेसाठी पात्र शेतकरी आणि महिला. या सर्वांविषयी माहिती खाली दिलेली आहे यामध्ये संकरित व देशी या दोन्ही प्रजातीतील जनावर आपण घेऊ शकतो .
संकरित गाई मध्ये एच. एफ. किंवा जर्सी म्हैस आणि मुरा किंवा जाफराबादी
देशी गाई मध्ये गीर ,साहिवाल ,रेड सिंधी, तलाठी ,थरपारकर, देवणी, लाल कंधारी, गावलावू व डांगळी या देशी जाती समाविष्ट आहे.

केंद्र शासन अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते .यामधील एक योजना म्हणजे केंद्र शासनाची विशेष केंद्रीय सहाय्य योजना सन 2021- 22 ही योजना विशेषता आदिवासी बांधवांसाठी आहे. या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.


finger down

गाय व म्हैस अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

 • सातबारा
 • 8 अ उतारा,
 • अपत्य दाखला,
 • स्वघोषणापत्र ,
 • आधार कार्ड ,
 • बँक खाते पासबुक सत्यप्रत, अनुसूचित जमाती असल्यास, जातीच्या दाखल्याची सत्यप्रत,
 • बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र,
 • ग्रामपंचायत नमुना नंबर 8,
 • रेशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र ,
 • दिव्यांग असल्यास दिव्यांगा चा दाखला,
 • जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत, शैक्षणिक पात्रतेचा दाखला म्हणजेच टीसी,
 • रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे, नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत ,
 • प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत,
 • रहिवासी प्रमाणपत्र,
 • लाभार्थ्याची स्वतःची जमीन नसल्यास भाडेतत्वावर जमीन घेतले बाबतचे, संमती पत्र ,
 • सातबारा व आठ अ उतारा सह रहिवासी प्रमाणपत्र.

गाय म्हैस योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता

 • लाभ घेणारा लाभार्थी हा आदिवासी महिला बचत गटातील सदस्य असणे गरजेचे आहे.
 • लाभार्थी सदस्य असलेला महिला बचत गट हा नोंदणीकृत असावा.
 • महिला बचत गट ज्या योजनेअंतर्गत स्थापन केलेला आहे ती योजना व गट चालू स्थितीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
 • अपंग विधवा अल्पभूधारक महिलांना प्राधान्य देण्यात यावे .
 • लाभार्थी याकडे गाई व म्हशी साठी जागा आणि पाण्याची सोय असावी. लाभार्थीकडे ओलिताचे क्षेत्र व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे .
 • किमान वीस गुंठे क्षेत्र सिंचनाखाली आवश्यक असून सातबारा उतारा व आठ उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक आहे .
 • तसेच सुका चारा उपलब्ध करून द्यावा.
 • सदस्य या योजनेचा लाभ घेणार आहे त्याच्याकडे किमान 4 गायी करिता गोठ्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे.
 • कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकेल लाभार्थ्याने दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण घेतलेले शासनमान्य संस्थेचे प्रमाणपत्र उदाहरणार्थ प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, दीनदयाल कौशल्य विकास योजना, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, राष्ट्रीयकृत बँक, कृषी विद्यापीठ ,आत्मा, यांना प्राधान्य देण्यात यावे.

finger down

योजनेचा फॉर्म कसा भरावा ?

गाय म्हैस योजनेसाठी तुम्ही पात्र असल्यास या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता. तेथून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. गाय म्हैस योजनेचा लाभ प्रत्येक आदिवासी शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी घ्यावा.(gayi mhashi anudan yojana)

गाय/म्हैस अनुदान योजना :

गाय म्हैस अनुदान योजना 2022 या योजनेअंतर्गत आदिवासी महिलांना दुधाळ जनावरे मिळणार आहेत त्यांच्यावर मिळणारे अनुदान आणि सवलत खालील प्रमाणे आहे :

अ.क्र.बाब२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
1संकरित गाईचा गट – प्रति गाय रु. ५५,०००/- प्रमाणे१,१०,०००
2प्रति गाय विमा रु. २,७५०/- (३ वर्षासाठी)५,५००
3वाहतुक खर्च प्रती लाभार्थी४,५००
एकूण प्रकल्प किंमत१,२०,०००

finger down

Share via
Copy link