Police Epass Maharashtra : जाणून घ्या जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास कसा Download करावा? Online Apply

epass maharashtra online,epass maharashtra 2021,travel epass maharashtra police,epass maharashtra apply online,epass,travel e pass maharashtra police,e-pass maharashtra 2021,travel pass maharashtra,epass maharashtra,maharashtra epass,covid19 epass maharashtra,lockdown epass maharashtra,epass documents maharashtra,maharashtra police,e pass maharashtra,maharashtra,epass registration 2021,maharashtra police e pass,maharashtra lockdown e-pass,e-pass,covid19.mhpolice.in epass 2021

Police E-pass Maharashtra : महाराष्ट्रात होत असलेल्या प्रचंड वाढीमुळे राज्यात कडक निर्बंध लादण्यात आलेले आहेत.त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने बाहेर पाडण्यासाठी बंदी लागू केली आहे, १३ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशांनंतर २२ एप्रिल पासून त्यामध्ये अतिरिक्त कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य असा प्रवास करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच Maharashtra Lockdown E-pass बंधनकारक केली आहेत.

अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आली असून अशा प्रवासासाठी Maharashtra Police E-pass  काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी पोलीस विभागाकडून संकेतस्थळाची लिंक देण्यात आली असून त्या लिंकवरून संबंधितांनी पाससाठी अर्ज करण्याचं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.

तर आपण घरबसल्या ई पास कसा काढावा हे जाणून घेऊया.

ई पास साठीची अधिकृत वेबसाईट आणि मेडिकल सटिफिकेट्चा फॉरमॅट डाउनलोड कण्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.

Maharashtra Lockdown E Pass Online कसा काढावा ?

याआधी देखील ई-पास काढण्यासाठी अशाच प्रकारे संकेतस्थळाचा पर्याय देण्यात आला होता. त्यावर ई-पास काढण्यासाठी अर्ज करण्यासाठी आणि पास मंजूर झाल्यास तो डाऊनलोड करण्यासाठी असे दोन पर्याय देण्यात येतात.१. आपल्या ब्राऊजरमधून https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जा. याच पेजवर तुम्हाला ई-पाससाठी अर्ज करण्याची आणि तो डाऊनलोड करण्याची लिंक दिसेल. संदर्भासाठी फोटो पाहा.How to get E pass in maharashtra२. या पेजवर दोन पर्याय असतील. त्यामध्ये जर तुम्ही नव्याने ई-पास करण्यासाठी अर्ज करत असाल, तर Apply For Pass Here या टॅबवर क्लिक करा.३. पुढच्या पेजवर तुम्हाला महाराष्ट्राबाहेर भेट देण्याची गरज आहे का? अशी विचारणा केली जाईल. आपल्याला हवा तो पर्याय त्यातून निवडा. इथे फक्त आंतरजिल्हा प्रवास करायचा असल्यास नाही पर्याय निवडा.How to get E pass in maharashtraमात्र, राज्याबाहेर जायचे असल्यास हो पर्याय निवडा. इथे तुम्हाला तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या निवडावी लागणार आहे.How to get e pass in maharashtra४. पुढच्या पेजवर तुम्हाला प्रवासासंदर्भात सर्व माहिती भरावी लागेल. यामध्ये तुमचं नाव, प्रवासाची तारीख, मोबाईल क्रमांक, प्रवासाचं कारण, वाहनाचा प्रकार, वाहनाचा क्रमांक, सध्याचा पत्ता, इमेल आयडी, प्रवास सुरू होण्याचं ठिकाण, प्रवासाचं शेवटचं ठिकाण, तुम्ही सध्या कंटेनमेंट झोनमध्ये आहात का? परतीचा प्रवास यासंदर्भातली माहिती भरावी लागणार आहे.How to get e pass in maharashtraया फॉर्मच्या खालीच तुमचा फोटो जोडण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. त्यासोबतच आधार कार्ड, वैद्यकीय कागदपत्रे (उपचारांसाठी जात असाल तर) अशी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. त्यासोबत डॉक्टरकडून घेतलेलं तुमचं फिटनेस सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी देखील लिंक देण्यात आली आहे.How to get e pass in maharashtraवरील सर्व माहिती भरल्यानंतर खाली Submit टॅबवर क्लिक केल्यास तुमचा ई पाससाठीचा अर्ज जमा होईल. त्याचा एक टोकन आयडी तुम्हाला मिळेल.How to get e pass in maharashtra५. आपला अर्ज मंजू झाला किंवा नाकारला गेला याचा तपशील पाहण्यासाठी पहिल्या पेजवरच्या दुसऱ्या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला माहिती मिळवता येईल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळालेला टोकन आयडी टाकून अर्जाचा तपशील पाहाता येईल. अर्ज मंजूर झाला असल्यास मिळालेला पास डाऊनलोड करण्याची लिंक देण्यात येईल. तिथून अर्ज डाऊनलोड करून घेता येईल.How to get e pass in maharashtraदरम्यान, ऑनलाईन प्रक्रियेसोबतच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देखील प्रवासासाठी पास मिळवता येऊ शकतो असं देखील पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पासचा वापर केवळ आपातकालीन परिस्थितीतच करावा, असं देखील सांगण्यात आलं आहे.

Leave a Comment

X