ई-पीक पाहणी पुन्हा मुदतवाढ ही आहे शेवटची तारीख | E Pik Pahani Last Date 2022 - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

ई-पीक पाहणी पुन्हा मुदतवाढ ही आहे शेवटची तारीख | E Pik Pahani Last Date 2022

3
5/5 - (4 votes)

E-Peek Pahani Last Date 2022 | नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही कास्तकार मध्ये स्वागत आहे महाराष्ट्र सरकारने यंदा पी पाहण्यात सुरू केलं आणि महसूल विभाग कृषी विभागाच्या वतीने संयुक्तपणे इ पीक पाहणी चा संयुक्त कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तर माझी शेती माझा सातबारा माझा पिक पेरा या घोषवाक्याचे आधारित राज्य शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याच्या प्रकल्पाची सुरुवात ही यंदा 15 ऑगस्टला झाली होती आणि काही जिल्ह्यांमध्ये पीक पाणी आपला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला तर काही ठिकाणी मात्र अजूनही हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

E Pik Pahani Overview

प्रकल्पाचे नावई-पीक पाहणी
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र सरकार ने
लाभार्थीमहाराष्ट्रातील सर्व शेतकरी
उद्देश७/१२ उताऱ्यावर आपल्या पिकांची नोंद
अप्लिकेशनVersion 2 Link
लास्ट डेट22 October 2022

हे पण वाचा – नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर! असे चेक करा यादीत नाव

तर राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून शेतकरी स्तरावरील पीक-पाणी ची नोंदणी करण्याची मुदत वाढ आहे ती सुमारे दोनदा आत्तापर्यंत देण्यात आली. सर्वात आधी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ करून 15 ऑक्टोबर पर्यंत शेत सर्व शेतकऱ्यांनी पीक पाहणी करावी असे आवाहन करण्यात आले.

E Pik Pahani Last Date 2022

परंतु असे असतानाही राज्यातील अजूनही काही शेतकरी हे पीक पाहणी करण्यापासून वंचित आहेत आणि त्यांनी अजूनही पीक पाहणी केलेली नाही. तर अशाच शेतकऱ्यांसाठी एक शेवटची संधी म्हणून पीक पाहणी करण्याकरिता एक नवीन शेवटची तारीख देण्यात आली, तर पीक पाहणी लास्ट डेट 22 ऑक्टोबर 2022 ही आहे.

ई पीक पाहणी नोंदवण्यास मुदतवाढ

ई पीक पाहणी अ‌ॅपद्वारे नोंदवण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. पीक पाहणी अ‌ॅपमधून नोंदणीची मुदत 15 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगामातील पिकाच्या नोंदणीला 7 दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकरी त्यांच्या स्तरावर पीक पाहणी 22 ऑक्टोबर पर्यंत करु शकतात.

हे पण वाचा – “या १२ जिल्ह्यांच्या” कर्जमाफी अनुदान याद्या डाउनलोड करा

बांधावर शेतकऱ्यांचं प्रबोधन ते विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

नाशिकच्या निफाड तालुक्यातील महसूल विभागाचे अधिकारी थेट बांधावर शेतकऱ्यांचे प्रबोधन करत आहेत. तर, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ई-पीक नोंदनीचे प्रशिक्षण देत आहेत. येत्या सात दिवसाच्या आता या ॲपद्वारे नोंदी न झाल्यास शासनाकडून नैसर्गिक आपत्ती योजनेतून आर्थिक मदतीला मुकावे लागणारा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पाहणी अ‌ॅपचा वापर करुन नोंदणी करावी, असं आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद

कृषीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात 28 हजार शेतकरी खातेदार आहेत. शेतकऱ्यांकडून या ई-पिक पाहणी ॲपला पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याचे चित्र दिसून आले होते. काही दिवसांपूर्वी सात हजार पाचशे शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी केली होती . त्यामुळे स्वतः तहसीलदार शरद घोरपडे गावोगावी जात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या ई-पीक पाहणी ॲप ची माहिती देत खरिपाची पीक नोंदणी करण्याचे आवाहन करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.

हे पण वाचा – pm mudra yojana in marathi

तर शेतकरी मित्रांनो आजच्या या लेखात आपण E Pik Pahani Last Date 2022 बद्दल सविस्तर माहिती घेतली. याच बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हिडीओ अवश्य पहा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचे जर पीक पाहणी व्हायचे असेल तर ते या लेखाच्या माध्यमातून त्यांची पिक पाहणी पूर्ण करून घेतील.

Video of E-Pik Pahani Last Date 2022

E-Pik Pahani Last Date | ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना वाढीव मुदत; आता ही आहे नवीन तारीख

E Pik Pahani Last Date 2022 FAQ

ई-पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख काय आहे?

E Pik Pahani Last Date 2022 वाढवण्यात आली असून 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत ई पीक पाहणी साठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

ई-पीक पाहणी करताना अडचण येत असल्यास काय करावे?

महाराष्ट्र शासनाकडून पाहणे एप्लीकेशन चे नवीन वर्जन म्हणजेच V2 जरी आलेले आहे तर सर्वात आधी प्ले स्टोअर मधून आपले ॲप अपडेट करून घ्यावे.

ई-पीक पाहणी करण्यासाठी कोणते शुल्क द्यावे लागते का?

नाही. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून राबविण्यात येणारा हा प्रकल्प पूर्णपणे मोफत आहे.

Share via
Copy link