महत्वाची बातमी! पुन्हा एकदा ई-पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ; जाणून घ्या किती दिवसाची आहे मुदत
शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सोयीसाठी शासन दरबारी अनेक योजना राबविल्या जातात, अशाच योजनेपैकी एक आहे ई-पीक पाहणी योजना. गत खरीप हंगामात या योजनेची सुरुवात करण्यात आली होती, त्या वेळी राज्य शासनाने मोठा गाजावाजा करत संपूर्ण राज्यात ई-पीक पाहणी योजना कार्यान्वित केली होती. खरीप हंगामात या योजनेसाठी शेतकरी बांधवांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला. शासनाकडूनही त्यावेळी मोठी जनजागृती करण्यात आली होती. मात्र, रब्बी हंगामात शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करण्याकडे पाठ फिरवली शासनाने देखील रब्बी हंगामात याविषयी जनजागृती करण्याकडे लक्ष दिले नाही.
वाचा – SBI Scheme : जाणून घ्या SBI ची ही फायदेशीर योजना! 1000 रूपयांच्या गुंतवणूकीत मिळताय तूफान लाभ
आता राज्यात नाफेडच्या वतीने रब्बीतील हरभऱ्याचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत, या खरेदी केंद्रावर हरभरा विक्री करण्यासाठी शेतकरी बांधवांना पिक पेऱ्याच्या नोंदी लागणार आहेत मात्र शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील पिकांच्या नोंदी ई पीक पाहणी अंतर्गत केल्या नसल्याने शेतकरी बांधवांना मोठ्या अडचणी येत आहेत. रब्बी हंगामात ई पीक पाहणी करण्यासाठी शासनाने 15 फेब्रुवारीपर्यंत शेतकरी बांधवांना मुदत दिली होती, मात्र तोपर्यंत अनेक शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केली नसल्याने शासनाने यामध्ये परत मुदतवाढ दिली आणि 28 फेब्रुवारी ही शेवटची तारीख घोषित करण्यात आली.
मात्र, पुन्हा एकदा शेतकरी बांधवांनी याकडे पाठ फिरवली त्यामुळे पुन्हा एकदा शासनाने ई पीक पाहणी करण्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे आता या कालावधीत किती शेतकरी ई पीक पाहणीत रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी करतात हे विशेष बघण्यासारखे असेल. खरीप हंगामात या योजनेसाठी राज्यातील तब्बल 84 लाख शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अंतर्गत पिकांच्या नोंदी केल्या होत्या.
वाचा – बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट)
खरीप हंगामात ही योजना नव्याने लागू करण्यात आली होती मात्र असे असले तरी या योजनेत खरिपात मोठा उस्फुर्त प्रतिसाद बघायला मिळाला होता. खरिपाच्या तुलनेत रब्बी हंगामामध्ये मोठा संथ प्रतिसाद या योजनेस बघायला मिळत आहे. दोन वेळा मुदतवाढ देऊनही ई-पीक पाहणी अंतर्गत शेतकरी बांधवांनी पिकांच्या नोंदी केल्या नाहीत त्यामुळे रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असताना शासनाने यात अजून एकदा मुदतवाढ दिली आहे.
आता शासनाने 15 मार्चपर्यंत यामध्ये मुदतवाढ दिली आहे. रब्बी हंगामातील हरभरासाठी राज्यात खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्या आहेत. या खरेदी केंद्रांवर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावात हरभरा विक्री करता येणार आहे. परंतु हरभरा विक्री करण्यासाठी खरेदी केंद्रावर नोंदणी करणे अनिवार्य आहे, खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी पिक पेरा याची गरज भासते आणि पिक पेराची नोंदणी ई-पीक पाहणी अंतर्गत होणार आहे. त्यामुळे ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी गरजेची आहे.
वाचा – Vertical Farming Business Idea: अशी होते विनामातीची, हवेत पिकणारी अनोखी शेती; लोणावळ्यातील या…
खरीप हंगामात रब्बीच्या तुलनेत नुकसानीचा धोका अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी करण्यात आली होती. रब्बी हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान हे कधीतरीच बघायला मिळते त्यामुळे या हंगामात शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी अंतर्गत पिकांच्या नोंदी केल्या नाहीत. असे असले तरी, शेतकरी बांधवांना आता हरभरा खरेदी केंद्रावर विक्रीसाठी पिक पेरा आवश्यक आहे आणि पिक पेरा ई पीक पाहणी नंतरच मिळणार आहे, त्यामुळे पीक पाहणी करणे अनिवार्य झाले आहे.
सौजन्य - कृषी जागरण
हे पण वाचा –
- VJNT Loan scheme 2023 – या योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज
- PM Kisan FPO Yojana | मोदी सरकारकडून मिळणार 15 लाखांपर्यंत कर्ज, योजनेबाबत जाणून घेण्यासाठी वाचा…
- Find Land Record: मोबाइलवर शेत-जमिनीचा ऑनलाईन नकाशा व आठ अ, 7/12 सातबारा पहा फक्त 2 मिनिटात
- Land Record 2023: शेत-जमिनीचा नकाशा ऑनलाईन व नवीन 7/12 सातबारा ऑनलाईन पहा फक्त 2 मिनिटात Online Nakasha
- जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान, कोणते शेतकरी असतील यासाठी पात्र? land record