E- Shram Card : ई-श्रम कार्डधारकांना लवकरच मिळणार दुसरा हप्ता, 'या' दिवशी बँक खात्यात जमा होणार पैसे - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

E- Shram Card : ई-श्रम कार्डधारकांना लवकरच मिळणार दुसरा हप्ता, ‘या’ दिवशी बँक खात्यात जमा होणार पैसे

0
5/5 - (2 votes)

E- Shram Card : ई-श्रम कार्ड ही योजना सरकारने 2021 मध्ये सुरु केली होती. या योजनेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

E- Shram Card : देशात दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणारा मोठा वर्ग आहे. या वर्गात अनेकदा असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. कोरोना (Corona Pandemic) महामारीमध्ये या वर्गाला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना त्यांच्या घरी जावे लागले. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने (Central Government) असंघटित क्षेत्रात (Unorganised Sector) काम करणाऱ्या मजुरांसाठी अतिशय खास योजना आणली आहे. ई-श्रम कार्ड योजना (E-Shram Card Yojana) असे या योजनेचे नाव आहे.


E-Shram Card Yojana नोंदणी अगदी मोफत आहे, खालील बटनवरून आताच नोंदणी करा

finger down

ही योजना सरकारने 2021 मध्ये सुरु केली होती. या योजनेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या योजनेद्वारे कामगारांना दरमहा आर्थिक मदतीबरोबरच सरकार दोन लाख रुपयांपर्यंतचा विमाही देते. सरकार लवकरच या योजनेचा पुढील हप्ता जारी करणार आहे. पुढील हप्त्याचे पैसे कसे मिळणार आणि ही प्रक्रिया नेमकी कशी असते याबद्दल जाणून घ्या.    

या तारखेपर्यंत कार्डधारकांना हप्त्याचा लाभ मिळणार : 

यापूर्वी सरकारने ई-श्रम कार्डधारकांना एक हजार रुपयांच्या हप्त्याचा लाभ दिला होता. आता सरकार 500 रुपयांचा पुढील हप्ता लवकरच जारी करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिन्याच्या अखेरीस सरकार लोकांच्या बँक खात्यात आर्थिक मदतीची रक्कम ट्रान्सफर करू शकते.


E-Shram Card Yojana नोंदणी अगदी मोफत आहे, खालील बटनवरून आताच नोंदणी करा

finger down

अशा प्रकारे, हप्त्याचे पैसे तपासा :

सरकारने पाठवलेल्या आर्थिक मदतीचा फायदा तुमच्यापर्यंत पोहोचला की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल. तुमचे पासबुक घेऊन बँकेत जा आणि तेथे पासबुक अपडेट केल्यानंतर ई-श्रम योजनेची आर्थिक मदत मिळाली की नाही ते तपासा. याशिवाय तुम्ही एटीएममध्ये जाऊनही खात्यात किती पैसे आहेत हे तपासू शकतात.  

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास हे लाभ मिळतात :

  1. दरमहा आर्थिक मदत मिळते. 
  2. दोन लाखांपर्यंत, विमा संरक्षण मिळते
  3. घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळेल. 


E-Shram Card Yojana नोंदणी अगदी मोफत आहे, खालील बटनवरून आताच नोंदणी करा

finger down

E-Shram Card Yojana Next Installment Date
Share via
Copy link