कमी खर्च जास्त नफा !उभारा स्वताचे इलेक्ट्रिक चार्जिंग (EV) स्टेशन आणि कमवा लाखों रुपये ! - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

कमी खर्च जास्त नफा !उभारा स्वताचे इलेक्ट्रिक चार्जिंग (EV) स्टेशन आणि कमवा लाखों रुपये !

1
4.3/5 - (11 votes)

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहे. हे चित्र बघून येणार युग हे इलेक्ट्रिक वाहनांचा राहील. या गोष्टीची सर्वांनाच खात्री आहे .त्यानुसार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन पावर स्टेशन मध्ये मोठमोठ्या कंपन्या ही आता इन्व्हेस्टमेंट करत आहे. जेव्हा कमी प्रदूषण करणारी आणि इलेक्ट्रिक वर चालणारी ही वाहने सर सर्वीकडे सर्रास दिसतील अशा वेळेस गरज भासेल ती इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन ची .अशा इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याची तुमच्याकडे आता मोठी संधी आहे. कमी इन्वेस्टमेंट मध्ये कमी खर्चात तुम्ही तुमचे स्वतःचे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारून मोठ्या प्रमाणे बक्कळ पैसा करू शकता .

चार्जिंग स्टेशन कशा प्रकारे तुम्ही तुमचे सुरू करू शकता. त्याच बरोबर चार्जिंग स्टेशन साठी तुम्हाला पूर्ण खर्च किती लागेल .आणि शासनाच्या काही नियम आणि अटी आहेत का? त्याच बरोबर या चार्जिंग स्टेशनची खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही कमी खर्चात मोठा नफा कमवू शकता. पेट्रोल पंप याप्रमाणे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी तुम्हाला कोणत्याही परवान्याची सध्या तरी गरज लागणार नाही. त्यामुळे चला बघुया चार्जिंग स्टेशन विषयी पूर्ण माहिती.

चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे भांडवलाची आवशक्यता आहे:

पब्लिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी तुम्हाला गरज आहे सर्वात आधी जागेची.
तर शहराच्या ठिकाणी एका चांगल्या लोकेशनवर मार्केटमध्ये कमीत कमी तीनशे ते चारशे चौरस फूट जागेची पब्लिक चार्जिंग स्टेशन साठी गरज आहे.
चार्जिंग स्टेशन वर तुम्ही एका वेळेस सहज 2-3 कार चार्ज करने शक्य झाले पाहिजे.
फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी 16.5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो.
तुम्ही तुमचं चार्जिंग स्टेशन 16 तास सुरू ठेवू शकता. त्यानुसार तुम्ही 3.5 रुपये प्रति युनिट किंवा त्यापेक्षा अधिक दराने शुल्क आकारू शकता.
लांब पल्ल्याच्या आणि अवजड वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनवर 100 किलोवॅटचे दोन चार्जर असणे आवश्यक आहे.
तथापि, बससारख्या अवजड वाहनांसाठी, बस डेपोजवळील चार्जिंग स्टेशनला प्राधान्य दिले जाईल.
जर तुम्हाला फास्ट चार्जर बसवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या चार्जिंग स्टेशनवर लिक्विड कूल्ड केबलचा वापर करावा लागेल.
जेणेकरून वाहनाची बॅटरी चार्ज होईल.

विद्युत निरीक्षकाची मंजुरी आवश्यक :

सार्वजनिक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी आपल्याला विद्युत निरीक्षकाच्या मंजुरीची आवश्यकता असेल .चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी जमीन भाड्याने देखील घेतली जाऊ शकते. यासाठी आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे .स्टेशनवर बसवलेली सर्व उपकरणे ISO प्रमाणिक असणे आवश्यक आहे.
ज्या विद्युत निरीक्षकाची आवश्यकता आहे त्या विद्युत निरीक्षकांची नियुक्ती स्थानिक वितरण कंपनी द्वारे केली जाते.

गुंतवलेल्या पूर्ण पैसा दोन वर्षातच परत कमवून आणखीनही नफा तुम्ही कमाऊ शकता

इलेक्ट्रिक वाहनांचा लोकप्रियतेचा झपाट्याने वाढलेला वेग पाहता. भविष्यात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन ची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे त्यामुळेच मार्केटिंग करायची गरजच करणार नाही विदाऊट मार्केटिंग तुमचा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात तुम्हाला नफा कमवून देऊ शकतो आणि तुम्ही गुंतवलेला पूर्ण पैसा काही दिवसातच परत मिळवून त्यामध्येही तुम्ही नफा कमवू शकता.

EV public charging station cost, Ev public charging station, electric charging station cost, electric charging station power cost, charging station, electric power station (petrol desel cost increases) petrol desel rate, technology bussiness,

Share via
Copy link