[ad_1]
रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukrain War) सुरू असलेल्या युद्धामुळे भारताच्या या दोन देशांसोबतच्या व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. भारतातून कृषीसह अन्य मालाची निर्यात (Agriculture Export To Russia) रशियाला होते. त्यामुळे रशियात मालाची निर्यात करणाऱ्या निर्यातदारांनी त्यांच्या मालाला विमा संरक्षण मिळवावे, असा सल्ला निर्यातदार पतपुरवठा हमी महामंडळ म्हणजेच ईसीजीसीने (ECGC) सर्व ग्राहकांना दिला आहे. यासाठी संबंधित निर्यातदारांनी महामंडळाच्या सेवा शाखांशी संपर्क करण्याचे आवाहनही ईसीजीसीने केले आहे.
हेही वाचा – ड्रोन खरेदीसाठी असा करा अर्ज
रशियाबरोबरच्या निर्यात व्यवहारांवरील संरक्षण (Export Protection) काढून घेतल्याच्या बातम्या विविध माध्यमांमधून प्रसारित झाल्या होत्या. त्यामुळे निर्यातदारांच्या मनात संभ्रमाचे वातावरण होते. रशियाला होणाऱ्या निर्यात (Export To Russia) व्यवहारांसाठीचे संरक्षण काढून घेतलेले नाही. तसेच या प्रकारच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण ईसीजीसीने २५ फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे दिले आहे.
हेही वाचा – तिसऱ्या तिमाहीत GDP ची गाडी ५.४ टक्क्यांवर अडकली
ईसीजीसीने सध्याच्या परिस्थितीवर आधारित व अंडररायटिंग धोरणानुसार, रशियाच्या जोखीम क्रमवारीचा आढावा घेतला होता. त्यानुसार, रशियाची आतापर्यंत असलेले ‘खुले संरक्षण’ श्रेणी बदलून ती २५ फेब्रुवारीपासून ‘मर्यादित संरक्षण- 1’ (RCC -1) अशी करण्यात आली आहे. या श्रेणीनुसार साधारणतः एक वर्षासाठी लागू असलेल्या मर्यादा प्रत्येक व्यवहाराच्या स्वरूपानुसार (case to case basis) स्वतंत्रपणे मंजूर केल्या जातील.
या बदलामुळे महामंडळाला निर्यात पतपुरवठा विमा पॉलिसीने संरक्षण दिलेल्या प्रत्येक निर्यात व्यवहारातील जोखमीचे मूल्यांकन व देखरेख स्वतंत्रपणे करता येईल आणि जोखमीची तीव्रता कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता येतील. या प्रक्रियेमुळे भारतातील निर्यातदारांना तसेच बँकांना देखील कल्पना येईल की, रशियातील ग्राहक व बँकांकडून मालाच्या किमतीची वसुली कधीपर्यंत व किती प्रमाणात होऊ शकेल.
दरम्यान, निर्यात पतपुरवठा हमी महामंडळ सद्यपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच पुढील घडामोडींचे निरीक्षण करून आपल्या अंडररायटिंग धोरणात योग्य तो बदल करेल, असे ईसीजीसीने म्हटले आहे.
[ad_2]
Source link