Farmer Scheme: शासनाची कल्याणकारी योजना…! या शेतकऱ्यांना मिळतील सात हजार रुपये, वाचा सविस्तर - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Farmer Scheme: शासनाची कल्याणकारी योजना…! या शेतकऱ्यांना मिळतील सात हजार रुपये, वाचा सविस्तर

0
Rate this post

[ad_1]

Farmer Scheme: शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो आपला भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी मायबाप शासन सातत्याने प्रयत्न करत असते. केंद्र सरकार आपल्या स्तरावर वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना राबवत असते. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Yojana) या योजनेचा देखील समावेश आहे.

केंद्र सरकार (Central Government) सोबतच राज्य सरकारही शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. मित्रांनो आता राज्य सरकार एका योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत देऊ करत आहे. निश्चितच यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या योजनेविषयी सविस्तर.

राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहे

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, हरियाणा सरकार (Hariyana) आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना 7000 रुपयांची आर्थिक मदत करत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाण्याची गरज असून देशातील पाण्याची पातळी सातत्याने खालावत चालली आहे. त्यामुळे हरियाणा सरकारने ही विशेष योजना सुरू केली आहे. ‘मेरा पानी मेरी विरासत योजना’ असे या योजनेचे नाव आहे.  ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना लगेच नोंदणी करण्याचं आव्हान या वेळी करण्यात आल आहे.

योजनेचे अनेक फायदे

या योजनेंतर्गत मका, तूर, उडीद, कापूस, बाजरी, तीळ आणि बेसन मूग (बैसाखी मूग) या पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना 7000 प्रति एकर आर्थिक मदत दिली जाईल.  भूजल पातळी वाचवण्यासाठी सूक्ष्म सिंचनावरही 80% अनुदान दिले जाईल. निश्चितच ही योजना पाणी वाचवण्यासाठी महागाव शासनाची धडपड अधोरेखित करीत आहे. शिवाय यामुळे शेतकरी बांधवांना देखील पाणी वाचवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

लाभार्थी अटी व शर्ती

•लाभार्थी हरियाणाचा कायमचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.

•50 Hz पॉवरची इलेक्ट्रिक मोटर वापरणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

•शेतकर्‍यांना त्यांच्या मागील वर्षीच्या धान उत्पादनात 50 टक्के विविधता आणावी लागेल.

•शेतकऱ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे बंधनकारक आहे.

लॉगिन पद्धत

या योजनेचा अर्ज करण्यासाठी, शेतकरी बांधवाना त्याच्या अधिकृत वेबसाइट https://fasal.haryana.gov.in/farmer/farmerlogin वर जावे लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना युजरनेम आणि पासवर्ड टाकावा लागेल. आता दिलेला कॅप्चा टाकून लॉगिन करावे लागेलं.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठीआम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link