farmer yield up to 22 quintals per acre achieved with proper management in soybean farming; Read the secret behind it| पितापुत्राची लई भारी जोडी..! सोयाबीन शेतीत योग्य व्यवस्थापण करून मिळवले एकरी 22 क्विंटल पर्यंत उत्पादन; वाचा यामागील गुपित - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

farmer yield up to 22 quintals per acre achieved with proper management in soybean farming; Read the secret behind it| पितापुत्राची लई भारी जोडी..! सोयाबीन शेतीत योग्य व्यवस्थापण करून मिळवले एकरी 22 क्विंटल पर्यंत उत्पादन; वाचा यामागील गुपित

0
Rate this post

[ad_1]

Soybean Farming: भारतात खरीप हंगामात (Kharif Season) मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती (Soybean Cultivation) केली जाते. आपल्या राज्यात देखील सोयाबीन (Soybean Crop) शेती विशेष उल्लेखनीय आहे. अकोला जिल्हा (Akola) सोयाबीन उत्पादनासाठी संपूर्ण भारतात ओळखला जातो.

जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Grower Farmer) वेगवेगळे प्रयोग राबवत हेक्टरी 35 क्विंटलपर्यंत उत्पादन घेत आहेत. अकोला जिल्ह्यातील सोनाळा येथील प्रयोगशील शेतकरी मनोहर शेगोकार व त्यांचे पुत्र विजय यांनी देखील सोयाबीन शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत चांगले दर्जेदार उत्पादन घेऊन दाखवले आहे.

या पिता-पुत्रांनी सुधारित बियाणांची निवड, पेरणी नंतर वं पेरणी पूर्वी योग्य व्यवस्थापन, सोयाबीन पेरणी ची विशिष्ट पद्धत या त्रिसूत्री पद्धतीचा वापर करून एकरी 20 क्विंटल पर्यंत दर्जेदार उत्पादन घेऊन दाखवले आहे.

यामुळे सध्या या पिता-पुत्रांनी पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली आहे. आज आपण या दोघा पिता-पुत्रांनी सोयाबीन शेती असं काय केलं ज्यामुळे त्यांना दर्जेदार उत्पादन मिळत आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

खरं पाहता विजय यांनी कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले आहे. विजय यांनी एम एस सी ऍग्री केल्यानंतर नोकरीऐवजी शेतीला प्राधान्य देत सोयाबीन लागवडीत आपल्या ज्ञानाचा सखोल वापर केला आहे. सोयाबीन पिकाचे सुधारित वाण विविध विद्यापीठातून उपलब्ध करून घेउन विजय व त्यांच्या वडिलांनी एकरी 20 ते 22 क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊन दाखवले आहे.

या पद्धतीने केले व्यवस्थापण 

या पिता-पुत्रांनी सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी मशागतीवर विशेष लक्ष केंद्रित केले. कुजलेल्या शेणखताच्या एकरी दहा बैलगाड्या वापरत मशागत केली आणि त्यानंतर सोयाबीनची पेरणी करण्यात आली.

कोणत्याही पिकाच्या दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी बियाण्यावर प्रक्रिया करणे अतिशय महत्त्वाचे आहे. या पिता पुत्रांनी देखील सोयाबीनच्या प्रगत वाणाच्या बियाण्यावर जैविक व रासायनिक पद्धतीने बिजोउपचार केले आहेत. बीज प्रक्रिया किंवा बीज उपचार केल्यामुळे पिकावर प्रादुर्भाव करणाऱ्या कीटकांवर आळा घालता येत असल्याचे या पिता-पुत्रांनी नमूद केले.

विशेष म्हणजे हे दोन्ही पिता-पुत्र कायमच सुधारित सोयाबीन बियाण्याची पेरणी करत असतात. सुरुवातीला फुले संगम या वाणाची पेरणी केली तदनंतर फुले किमया या वाणाची पेरणी केली तर गतवर्षी या पिता-पुत्राने पीडीकेव्ही अंबा या वाणाची प्रायोगिक तत्त्वावर त्यांच्या दोन एकर क्षेत्रात पेरणी केली.

खरं पाहता सोयाबीन पेरणी साठी एकरी 30 किलो बियाणे लागते. मात्र या पिता-पुत्रांनी मजुरांच्या माध्यमातून टोकण पद्धतीने पेरणी केली. दोन फूट बाय दहा सेंटिमीटर या अंतरावर कमी केल्यामुळे एकरी केवळ दहा किलो बियाणे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सोयाबीन पिकाच्या जोमदार वाढीसाठी हेक्टरी 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 30 किलो पालाश अशा पद्धतीने NPK पोषक तत्वांची गरज भागवण्यात येते.

पेरणी केल्यानंतर सुमारे 15 दिवसांनी खोडमाशी व पाने खाणाऱ्या अळ्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून फ्लुबेंडियाएमाईडची फवारणी या पिता-पुत्रांनी केली आहे.

सोयाबीन पेरणी केल्यानंतर 25 ते 30 दिवस झाल्यावर सोयाबीन पानावरील ठिपके नियंत्रण करण्यासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइडची फवारणी केल्याचे या पिता-पुत्रांनी नमूद केले.

याशिवाय या पिता-पुत्रांनी सोयाबीन पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकरी सात पिवळे चिकट सापळे लावले होते.

याशिवाय या दोघांनी कामगंध सापळे देखील बसवले होते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, अळ्यांच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे वापरले जातात.

एवढेच नाही तर सोयाबीन वर मोठ्या प्रमाणात अटॅक करणाऱ्या तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइडचा वापर या दोघा पिता पुत्रांनी केला आहे. सोयाबीन पेरणी झाल्याच्या 70 ते 75 दिवसानंतर सोयाबीनच्या शेंगाना करपा रोग होत असतो याच्या नियंत्रणासाठी तसेच बियाण्याची प्रत सुधारण्यासाठी शेवटची फवारणी.

याशिवाय पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पिकातून जोमदार उत्पादन मिळवण्यासाठी अन्नद्रव्यांची फवारणी या दोघांनी केली.

सोयाबीनच्या फांद्या वाढीसाठी जिबरेलिक ॲसिडचा देखील सोयाबीन पिकासाठी वापर करण्यात आला.

या दोघा पिता-पुत्राकडे ओलिताची व्यवस्था उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत फुलोरा अवस्थेत व शेंगेत दाणे भरायच्या अवस्थेत पावसाचा खंड राहिल्यास आवश्यक तेवढे गरजेनुसार पाणी भरण्यात आले.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link