Farmers in Maharashtra prefer Chana farming over wheat


कृषी विभागाने नुकताच रब्बी हंगामाचा अंतिम पीक पेरणी अहवाल जाहीर केला आहे. राज्यात रब्बी पिकाखालचे सरासरी क्षेत्र 51.20 लाख हेक्टर असते. पीक पेरणी अहवालानुसार गेल्या 3 जानेवारी अखेर 50.83 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असल्याचे विभागाने (Agriculture Department) म्हटले आहे. म्हणजेच या रब्बीत (Rabi season) सरासरीच्या 99.27 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

हे देखिल वाचा – द्राक्ष बागांना फटका शक्य 

पेरणी झालेल्या पिकांची परिस्थिती पाहायला गेल्यास गहू, ज्वारी, मका, हरभरा, आणि करडई पिकांच्या पेरण्या अजूनही काही प्रमाणात सुरू आहेत. रब्बी ज्वारी (Rabi sorghum) पीक काही ठिकाणी वाढीच्या ते पोटरीच्या अवस्थेत आहे. तर गहू मुगूट मुळे फुटणे, फुटवे फुटणे, ते लोंबी धरण्याच्या अवस्थेत आहे.

हा व्हिडिओ पाहिलात का? – 

रब्बीतील सर्वात महत्त्वाचे पीक म्हणजे हरभरा (Chana). त्याचा यंदाच्या रब्बीच्या एकूण पेऱ्यात 48 टक्के वाटा आहे. हा हरभरा सध्या फांद्या फुटणे ते फुलोरा अवस्थेत असल्याचे पीक पेरणी अहवालावरून स्पष्ट होते. मक्यावर मात्र काही ठिकाणी लष्करी अळीचा (Fall Army Worm) प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाने मान्य केले असून त्यावर उपाय सुरू असल्याचे सांगितले आहे. राज्यातील मका पीक सध्या वाढीच्या ते पोटरीच्या अवस्थेत आहे.

हे देखिल वाचा – प्रतिकूलता पुन्हा मोसंबी बागांच्या मुळावर

या अहवालात समोर आलेली महत्त्वाची बाब म्हणजे यंदा राज्यात तृणधान्यांचा (cereals) पेरा जवळपास 7 टक्क्यांनी घटला असून कडधान्यांचा (pulses) पेरा बरोबर 7 टक्क्यांनीच वाढला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी गव्हाऐवजी हरभऱ्याला वाढती पसंती देत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्या वर्षीही राज्यात तृणधान्यांचा पेरा घटून हरभऱ्याचा पेरा वाढला होता.Source link

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज हवामान अंदाज, मान्सून 2021 अपडेट, पाऊस अंदाज व शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.

Leave a Comment