Fertilizers Subsidy । शेतकऱ्यांना खतांच्या दरवाढीपासून मिळणार दिलासा ; खतांवरील अनुदान वाढविण्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Fertilizers Subsidy । शेतकऱ्यांना खतांच्या दरवाढीपासून मिळणार दिलासा ; खतांवरील अनुदान वाढविण्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी

0
5/5 - (1 vote)

Fertilizers Subsidy Update in Marathi। खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना आता शेती कशी करायची अशी चिंता लागून राहिली आहे. कारण एकीकडे इंधनाचे दर वाढले असताना रासायनिक खतांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असताना शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार कडून खतांवरील अनुदान वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती आहे. NPK खतांच्या अनुदानात वाढ होण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याचीही शक्यता आहे.

Fertilizers Subsidy Update in Marathi

यंदाच्या वर्षी खतांवरील अनुदान हे 21,000 कोटींवरून 60 हजार कोटी इतके वाढवण्यात आल्याचे कळते आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात अन्नधान्याच्या किमती वाढण्याला ब्रेक लागेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गेल्या वर्षी जानेवारीपासून खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत त्यामुळे देशातील खाद्य पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्‍यता आहे. शिवाय रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारतातील खतांच्या आयातीवर ही परिणाम झाल्यास अशा परिस्थितीत खतांवर दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ केल्यास भाववाढ रोखता येईल.

खतांवरील अनुदान वाढविण्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी

रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर वारंवार खतांच्या किमती मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कारण केंद्र सरकार आता खतांचे अनुदान वाढवण्याची शक्यता आहे. या वर्षीच्या खरीप हंगामात 354 लाख टन खतांची मागणी अपेक्षित असताना त्याची उपलब्धता 485 लाख टन राहण्याचा अंदाज आहेत असं सांगण्यात येत आहे. यामध्ये देशांतर्गत आणि आयातीत अशा दोन्ही खतांचा समावेश आहे. शिवाय अर्थसंकल्पीय भाषणामध्ये युरिया अनुदानासाठी 63,222 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं होतं. शिवाय केंद्र सरकार देशांतर्गत खते तयार करण्याला देखील प्रोत्साहन देत आहे.

हे पण वाचा –

modi-farmers
Share via
Copy link