[ad_1]
शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाला चांगला दर हवा असेल तर त्यांनी उत्पादनाच्या गुणवत्तेची काळजी घ्यायला हवी, असं प्रतिपादन नुकतंच केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केलंय.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) ९३ व्या वार्षिक महासभेत तोमर बोलत होते. तोमर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना नेहमीच पाठबळ दिलेलं आहे. जागतिक बाजाराशी स्पर्धा करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी आणि कृषी संशोधकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून भारताच्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होताना दिसत आहे
हेही वाचा ; या आठवड्यात कमाल तापमानात वाढीची शक्यता
भारतीय कृषी (Indian agriculture) उत्पादनांची गुणवत्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी काळजीचा विषय राहिल्याचं सांगताना तोमर यांनी कृषी उत्पादन वाढीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या योगदानाचाही गौरव केला आहे.
हेही वाचा ; भाजीपाला उत्पादनातून केली ओळख.
कृषी क्षेत्रातील संशोधन आणि तंत्रज्ञान(Technology) विकासाच्या माध्यमातून भारतीय कृषी संशोधन परिषदेने देशाची खाद्य व पोषक घटकांची गरज भागवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. देशातील गरज भागवण्यासोबतच जगातील( World) अनेक देशांची मागणी पूर करण्याचं काम भारतीय कृषी क्षेत्राकडून होत आहे.
हा व्हिडिओ नक्की पाहा.
काही कृषी उत्पादनात भारत आजमितीस पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर आहे. आजमितीस भारत(India) कृषी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात निर्यात करतो. त्यामुळेच भारतीय कृषी उत्पादनांची गुणवत्ता अव्वल असायला हवी. गुणवत्तेबाबत भारतीय उत्पादनांबद्दल जगभरात विश्वासार्हता निर्माण करायला हवी, असा सरकारचा (Goverment) प्रयत्न आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांना चांगला भाव मिळवायचा असेल तर आपल्या उत्पादनाचा दर्जा वाढवण्यावर भर देण्याची गरज असल्याचंही तोमर यांनी नमूद केलंय.
२०२९ साली भारतीय कृषी संशोधन परिषदेला (National Agricultural Research Council )१०० वर्षे होणार आहेत. संस्थेने आपला शताब्दी महोत्सव आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर साजरा करावा, त्यासाठीची पूर्वतयारी करण्याचे आवाहन तोमर यांनी यावेळी केले आहे.
![]() |
ReplyForward |
[ad_2]
Source link