या भागात गारपिटीमुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान, पिक विमा नुकसान भरपाई मिळणार काय? Havaman Andaj Today
Weather Alert: हवामान खात्याचा जोरदार पाऊस आणि गारपिटीचा इशारा अखेर खरा ठरला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विदर्भात काल रात्री रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी गारपीटही झाली आहे .त्यामुळे आता पंचनामे होणार काय आणि पिक विमा भरपाई कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ? असा प्रश्न शेतकर्यांना पडलेला आहे.
garpit nuksan bharpai news 2022
शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाच्या अशा अवकाळी पावसाने काढून घेतला आहे. नागपूर , गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट आणि जोरदार पाऊस झालेला आहे .त्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला आणि तापमान कमी झाले आहे. यापूर्वी पावसाने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस या पिकाचेही नुकसान केले होते. या हंगामातील पिकाची शेतकऱ्यांना आशा लागली होती. पण पावसाने यावरही पाणी फिरल आहे.
गारपिटीमुळे झालेले विदर्भातील पिकांचे नुकसान
गारपिटीचा या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. गहू , हरभरा ,तुर त्याच बरोबर बागातदार शेतकऱ्यांची संत्रा, भाजीपाला या पिकांनाही मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे .बदललेल्या निसर्गचक्र मुळे आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत शेती करणे शेतकऱ्यांसाठी अवघड होऊन बसला आहे .हवामान खात्याने 11 jan 2022 तारखे पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आणि ढगाळ वातावरण राहील असा हवामान अंदाज सांगितला आहे. त्यामुळे आता तर पिकाचे नुकसान झालेच आहे. पण आणखीन कोणते संकट येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहायला हवे.
कांदा पिकाचे नुकसान
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव तालुक्यात कांद्याचे मोठे उत्पादन होते. लासलगाव ही जगप्रसिद्ध बाजारपेठ मानली जाते .सध्या शेतकऱ्यांचा कांदा काढलेला आला आहे. अनेक शेतामध्ये कांदा काढून कांद्याचा डिग लावलेला आहे. तर काही ठिकाणी कांदा काढण्याचे काम सुरू आहे त्यामुळे अशा अवकाळी पावसामुळे कांद्या उत्पादनला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.
द्राक्ष बागानाही मोठे नुकसान
अवकाळी पावसामुळे द्राक्षांच्या माळ्यांना तडे जाऊ शकतात. निफाड तालुक्यातल्या द्राक्ष बागांना या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे भुरी व डाऊनी गळ कुज यासारखे रोग द्राक्ष पिकावर हमला करत आहे. त्यामुळे द्राक्ष पिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची दाट शक्यता तज्ञांनी दर्शविली आहे.
भात पिकाचेही मोठे नुकसान
जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी सध्या भात, नागरी, उडीद, खुर्सानीची पिके कापून ठेवली आहेत . त्याच सोबत अनेक शेतकऱ्यांनी मका सुद्धा काढणीला घेतलेला आहे. अशावेळी अवकाळी पावसामुळे अर्ध काढलेले पीक शेतातच पडले राहून पिकाची नासाडी झालेली आहे. ते रानात पडलेले पिक उचलायचे तरी कसे असा प्रश्नामुळे शेतकरी की चीन बिल झालेला आहे.
हे पण वाचा –
- कापूस उत्पादकांच्या मनातील व्यथा – शाहीर लक्ष्मणराव हिरे | अतिशय ह्रदयस्पर्शी असे हे शब्द, नक्की पहा
- talathi bharti तलाठी भरती ४१२२ पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु
- Kanda Bajar Bhav Today : आजचे कांदा बाजार भाव
- Tur Bajar Bhav: आजचे तूर बाजार भाव
- Soyabean Bajar Bhav: आजचे सोयाबीन बाजारभाव