Personal Loan । आता घरबसल्या मिळवा 35 लाखांपर्यंत कर्ज, ‘या’ बँकेची भन्नाट ऑफर सुरू.. - Amhi Kastkar

Personal Loan । आता घरबसल्या मिळवा 35 लाखांपर्यंत कर्ज, ‘या’ बँकेची भन्नाट ऑफर सुरू..

4.5/5 - (2 votes)

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहकांसाठी फक्त एका क्लिकवर वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. बँकेच्या ग्राहकांना 35 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आता घरी बसून ऑनलाईन पद्धतीने सहज घेता येणार आहे. बँकेत न जाता ग्राहकांना 35 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेता येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे बँकेत घेऊन जाऊन देण्याची गरज भासणार नाही. हे सगळं काम ग्राहक घरबसल्या करू शकतात. याशिवाय 35 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) ग्राहकांना ऑनलाईन घेता येणार आहे.

State Bank Of India म्हणजेच एसबीआयने आपल्या डिजिटल बँकिंग सुविधा पुरवणाऱ्या योनो ॲपवर रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट योजना लाँच केली आहे. या खास सुविधेमुळे ग्राहकांना कर्जासाठी आता बॅंकेत जाण्याची गरज नाही. जर बँकेच्या ग्राहकांना कर्ज हवं असेल तर पात्र ग्राहकांना आता योनो ॲपवरून (YONO App) वैयक्तिक कर्ज घेता येणार आहे.

एसबीआय रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिटवरील (Real Time Xpress Credit) पर्सनल लोन सुविधा पगारदार ग्राहकांना उपलब्ध होऊ शकते. अशा पगारदार, नोकरदार व्यक्तींचे जर एसबीआय बॅंकेत वेतन खाते (Salary Account) असेल, तर ते या कर्जासाठी पात्र असणार आहे, असा बँकेचा नियम आहे. ग्राहकांना डिजिटली सक्षम बनवण्याच्या आणि अतिरिक्त सुविधा देण्याच्या उद्देशाने बँकेने ही सुविधा दिली आहे.

कर्ज सुलभतेसाठी कर्ज पात्रता, क्रेडिट चौकशी, कर्ज मंजूरी आणि दस्तऐवज सादर करणे व इतर प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केल्या जातात. ही सर्व कामे ऑनलाइन केली जातील. सध्याच्या काळात पूर्णपणे डिजिटल बँकिंग सुविधा देण्यासाठी बँक तत्पर असल्याचं सांगितलं आहे.

कर्ज कोणाला मिळू शकते?

  1.  ज्यांचे वेतन खाते म्हणजेच सॅलरी अकाऊंट SBI मध्ये आहे.
  2.  ज्या नोकरदारांचे कमीत कमी वेतन 15,000 रुपये प्रति महिना असेल, असे लोक पात्र असतील.
  3.  केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे कर्मचारी, केंद्रीय PSUs आणि नफा कमावणाऱ्या राज्य PSU चे कर्मचारी, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी, बँकेशी संलग्न किंवा नसलेल्या निवडक खाजगी कंपन्यांचे कर्मचारी देखील बँकेच्या या खास सुविधेचा फायदा घेऊ शकतात.

get-a-loan-of-up-to-rs-35-lakh-from-home-now-check-offer

Leave a Comment

Share via
Copy link