Goat Farming: गाई-म्हशीला जड भरतंया शेळीपालन…! ‘या’ जातीच्या शेळीचे पालन करा लाखोंत नव्हे करोडोत कमवा - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

Goat Farming: गाई-म्हशीला जड भरतंया शेळीपालन…! ‘या’ जातीच्या शेळीचे पालन करा लाखोंत नव्हे करोडोत कमवा

0
Rate this post

[ad_1]

Goat Farming: भारतात शेती (Farming) व्यवसायाच्या सुरवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पशुपालन (Animal Husbandry) व्यवसाय केला जात आहे. पशुपालन व्यवसाय शेतकरी बांधवांना (Farmer) अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) कमवण्यासाठी एक शाश्वत साधन बनले आहे.

देशातील शेतकरी बांधव पशुपालनात सर्वाधिक गाई-म्हशीचे पालन (Cow Rearing) करत असतात. मात्र असे असले तरी देशातील अल्पभूधारक शेतकरी बांधव प्रामुख्याने शेळी पालन (Goat Rearing) करत असतात. कमी खर्चात शेळी पालन सुरु करता येत असल्याने अनेक शेतकरी बांधव आता शेळीपालन व्यवसायाकडे वळत आहेत.

शेळीपालन व्यवसायासाठी अतिशय कमी जागा आणि कमी भांडवल लागते शिवाय यापासून मिळणारे उत्पन्नदेखील चांगले समाधान कारक असते. यामुळे मायबाप शासन देखील शेतकरी बांधवांना शेळीपालन व्यवसायासाठी प्रोत्साहित करीत आहे यासाठी शासन दरबारी कायमच नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जातात.

जाणकार लोकांच्या मते, जर पशुपालक शेतकरी बांधवांनी सुधारित आणि प्रगत जातींचे शेळीपालन केले तर निश्चितच त्यांना लाखो रुपयांची कमाई होणारं आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आमच्या शेतकरी वाचक मित्रांसाठी शेळीच्या एका प्रगत जातींची (goat breed) माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

दुंबा शेळी (Dumba Goat) 

खरं पाहता दुंबा शेळी ही एक शेळीची विदेशी जात आहे. मात्र असे असले तरी, उत्तर प्रदेश राज्यात दुंबा जातीची शेळी मोठ्या प्रमाणात पाळली जात आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या शेळीला बाजारात कायमचं मोठी मागणी असते. या क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, बकरीदच्या वेळी या शेळीला मोठा डिमांड असतो.

या कालावधीत या जातीचा बोकड बाजारात दुप्पट भावाने विकला जातो. विशेष म्हणजे मागणीनुसार पुरवठा देखील अनेकदा होत नाही. जाणकार सांगतात की या जातीचा 25 किलो वजनाचा बोकड जवळपास 80 हजाराच्या आसपास विकला जातो. एवढेच नाही तर बाजारात या जातीच्या करडाची किंमत जवळपास 30 हजार रुपयाच्या आसपास असते.

या जातींच्या शेळीचा खुराक देखील चांगला असतो. सकाळ-संध्याकाळ दुंबा जातीच्या शेळीला हिरवा चाऱ्यासोबत डाळ आणि हरभरा दिला जातो. जाणकार सांगतात की चांगली निरोगी शेळी किंवा बोकड दीड लाख रुपयांपर्यंत बाजारात विकले जाते. निश्चितच या जातीच्या शेळींचे मोठ्या प्रमाणात पालन करून शेतकरी बांधव लाखो नव्हे करोडो कमावणार आहेत.

[ad_2]

आम्ही कास्तकार.कॉम वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा. तसेच शेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.

Share via
Copy link