[ad_1]
आंतराराष्ट्रीय बाजारात (आणि म्हणून भारतीय बाजारात देखील ) सोन्याचे भाव भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. विविध देशांच्या केंद्रीय बँकांकडे साठलेले डॉलर्स गेली अनेक दशके त्या बँका अमेरिकी सरकारच्या रोख्यांमध्ये गुंतवत आहेत. कारण अमेरिकेचे चलन डॉलर हे जगात एक स्थिर चलन मानले गेले आहे. परंतु २००८ मधील सबप्राइम अरिष्टानंतर अमेरिकी वित्त प्रणालीबद्दलच्या विश्वासाला पहिला तडा गेला. त्यामुळे केंद्रीय बँकांचा अमेरिकी डॉलरबद्दलचा विश्वास डळमळू लागला. तेव्हापासून अनेक देशांच्या केंद्रीय बँका त्यांच्याकडील परकीय चलनाच्या गंगाजळीतील काही भाग अमेरिकन रोख्यांऐवजी सोन्यात गुंतवू लागल्या आहेत.
हेही पाहा -Soybean Price वाढूनही चीनची आयात विक्रमी राहणार
दरवर्षी हे प्रमाण वाढत आहे. जगातील सर्व केंद्रीय बँकांकडील एकत्रित सोन्याचे साठे ऐतिहासिक उंचीवर आहेत. रशियाच्या केंद्रीय बँकेने अमेरिकी रोख्यात गुंतवलेले काही शे बिलियन्स डॉलर्स अमेरिकेने गोठवले आहेत. त्यामुळे अनेक देशांच्या केंद्रीय बँकांच्या/ राजकीय नेत्यांच्या मनात पाल चुकचुकली आहे. ‘भविष्यात आपले अमेरिकी सरकरबरोबर काही बिनसले तर अमेरिका केव्हाही आपल्या त्यांच्याकडील गुंतवणुकी गोठवु शकते; पुढे जाऊन आपल्याच गुंतवणुकीचा आपल्या विरुद्ध ब्लॅकमेलसाठी वापर करू शकते’ अशी भावना निर्माण झाली आहे.
हेही वाचा- उन्हाळ कांद्याची एकरी उत्पादकता घटणार?
त्यामुळे सर्वच केंद्रीय बँका सोन्याच्या खरेदीचे प्रमाण वाढवू शकतात, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. अर्थात त्याचा गाजावाजा केला जाणार नाही.
हेही वाचा- डायरियाच्या साथीमुळे पशुधन धोक्यात
जगात जेव्हापासून वस्तुविनिमय पध्दत (बार्टर सिस्टीम) जाऊन कोणत्या तरी चलनाचा वापर होऊ लागला तेव्हापासून माणसाच्या पाठीवर बसलेले सोन्याचे भूत शेकडो वर्षे झाली तरी उतरायला काही तयार नाही.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.