Gudi Padwa Wishes in Marathi : मंगळवारी १३ एप्रिल ला गुढीपाडवा असून, हा एक भारतीय सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. गुढी पाडवा हा भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील प्रमुख सण आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारली जाते. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.
Latest Gudi Padwa Wishes SMS ( गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ) in Marathi. We always update Marathi Gudipadwa Messages in this category so you will get Latest & New Gudhi Padwa SMS in Marathi. Send Gudipadva texts or picture SMS in Marathi to your friends & share the joy of the Gudhi Padva festival with them. Enjoy our Best Gudi Padwa SMS Collection in Marathi & Share Gudi Padhwa Wishes Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Say Happy Gudhi Padwa to your Friends. Gudipadva SMS is also known as Gudhi Padwa Quotes or Gudi Padwa Status in Marathi.
तुम्ही जर गुढीपाडवा SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच गुडीपाडवा संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.
महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. या दिवसाच्या विशेष प्रकारे शुभेच्छा दिल्या जातात. सध्या करोना विषाणू थैमान घालत असतांना आपण आपल्या आप्तेष्टांची भेट घेऊ शकत नसलो तरी व्हॉटसअॅप, फेसबुक, व्हिडीओ कॉल अश्या सोशल साइट्सचा वापर करून शुभेच्छा देऊ शकतो. याच शुभेच्छा देण्यासाठी काही शुभेच्छा संदेश आहोत.
Gudi Padwa Wishes in Marathi
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे..
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे..
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Gudi Padwa Chya Hardik Shubhechha
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudhipadvyachya Shubhechha in Advance
तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
Gudi Padwa Wishes in Marathi
मी नाही दिला..
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख,शांती,समृद्धी..!!!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा in Advance!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
उभारून आनंदाची गुढी दारी,
Gudi Padwa Wishes in Marathi
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा..
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा..
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण..
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudi Padwa Message in Marathi
प्रसन्नतेचा साज घेऊन,
Gudi Padwa Wishes in Marathi
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!
Marathi Nav Varshachya Hardik Shubhechha
जल्लोष नववर्षाचा..
Gudi Padwa Wishes in Marathi
मराठी अस्मितेचा..
हिंदू संस्कृतीचा..
सण उत्साहाचा..
मराठी मनाचा..
तुम्हाला व कुटूंबियांना,
Gudi Padwa Wishes in Marathi
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
Gudi Padwa Quotes in Marathi
गुढी उभारून आकाशी,
Gudi Padwa Wishes in Marathi
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
Gudhipadvyachya Shubhechha
निळ्या निळ्या आभाळी,
Gudi Padwa Wishes in Marathi
शोभे उंच गुढी..
नवे नवे वर्ष आले,
घेऊन गूळसाखरेची गोडी..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
Gudhi Padvyachya Hardik Shubhechha
नेसून साडी माळून गजरा
Gudi Padwa Wishes in Marathi
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन..
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
Hindu Nav Varsh Hardik Shubhechha
नेसून साडी माळून गजरा
Gudi Padwa Wishes in Marathi
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन..
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
Gudi Padwa Marathi Shubhechha
वसंत ऋतूच्या आगमनी,
Gudi Padwa Wishes in Marathi
कोकिळा गाई मंजुळ गाणी..
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी..
गुढी पाडव्याच्या आणि
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudi Padwa Hardik Shubhechha SMS
चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात..
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Nutan Varshabhinandan SMS
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला..
नूतन वर्षाभिनंदन!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Gudi Padwa Hardik Shubhechha in Marathi
श्रीखंड पूरी,
रेशमी गुढी,
लिंबाचे पान,
नव वर्ष जाओ छान..
आमच्या सर्वांच्या तर्फे
हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी गुढी पाड़वा..!
Happy Gudi Padwa SMS in Marathi
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती..
Happy Gudi Padwa!
Gudi Padwa SMS in Marathi
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू..
Happy Gudi Padwa!
Gudi Padwa Shubhechha in Marathi
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी..
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
Gudi Padwa Navin Varsh SMS Marathi
नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष..
Happy Gudi Padwa!
“उभारून गुढी लावू विजय पताका
संस्कार संस्कृतीच्या विस्तारू शाखा
पुर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!”
“उभारू गुढी सुख-समृद्धीची
सुरुवात करूया नववर्षाची..
लढुनिया करोना संसर्गाशी
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची
वाटचाल करूया नव आशेची”
gudi padwa 2021 : गुढीपाडव्याचे अलौकीक महत्व
“उभारून आनंदाची गुढी दारी
करोनाला देऊनी मात भारी
जीवनात येवो रंगत न्यारी
पुर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांशा
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!”
“आनंदाचे तोरण लागो दारी
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,
सुखासमाधानाचे असो आगामी वर्ष ही सदिच्छा..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..”
यंदाच्या गुढीपाडव्याचा मुहूर्त आणि खास वैशिष्ट्य
गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते. पौराणिक कथेनुसार, शालिवाहन नामक एक कुंभाराचा पुत्र होता. शत्रू त्याला खूप त्रास देत असत. मात्र, एकटा असल्यामुळे तो शत्रूशी लढा देण्यास असमर्थ होता. तेव्हा त्याने एक युक्ती केली. शत्रूशी सामना करण्यासाठी त्याने मातीचे सैनिक तयार केले. पाणी शिंपडून त्यांच्यात जीव भरला. शत्रूचे आक्रमण झाले, तेव्हा हेच सैन्य लढले आणि विजयी झाले. तेव्हापासून शालिवाहन शकाचा आरंभ झाला, अशी मान्यता आहे.
आपल्या सध्याच्या परिस्थितीत करोना कहरावर मात करून पुन्हा आधीसारखे जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, तर आपण देखील करोनावर मात करण्यासाठी साखळी तोडून करोना नियमांचे पालन करून किंवा करोना विषाणूचा खुपलेला हा काटा काढून नविन वर्षात नविन संकल्प करून आयुष्याला सुरवात करूया.
गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आम्ही कास्तकार च्या संपुर्ण समुहाकडून हार्दिक शुभेच्छा.