हळद पोहचली 10 हजार रुपयापर्यंत! हळदीच्या भावांमध्ये आणखीन तेजी येण्याचे संकेत ! - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

हळद पोहचली 10 हजार रुपयापर्यंत! हळदीच्या भावांमध्ये आणखीन तेजी येण्याचे संकेत !

0
Rate this post

यावर्षी सर्व चक्र बिघडले .या सर्वांचा परिणाम हळद पिकावर झालेला आहे .हळद पिकाच्या उत्पादनामध्ये 15 ते 20 टक्के घट दिसून येण्याची शक्यता तज्ञांनी दर्शविली आहे. सातारा ,सांगली या भागातील हळद फेब्रुवारीपर्यंत निघून जाते महाराष्ट्रातील हळदी खाली सर्वाधिक क्षेत्र हे विदर्भ-मराठवाड्यात आहे. (Vidarbha news, marathvada news)

जमिनीमध्ये पक्व होणाऱ्या शेतमालाला नैसर्गिक संकटांचा फटका बसत नाही असे वाटत असले तरी शेतात येणाऱ्या प्रत्येक पिकाला नैसर्गिक संकटांशी सामना करावा लागतो. हे मात्र खरे!
हळद हे पीक जमिनीच्या आत मध्ये परिपक्व होते. यावर्षी हंगामात पावसाळा लांबणीवर गेला. त्यामुळेच सर्व चक्र बिघडले .या सर्वांचा परिणाम हळद पिकावर झालेला आहे .हळद पिकाच्या उत्पादनामध्ये 15 ते 20 टक्के घट दिसून येण्याची शक्यता तज्ञांनी दर्शविली आहे. सातारा ,सांगली या भागातील हळद फेब्रुवारीपर्यंत निघून जाते महाराष्ट्रातील हळदी खाली सर्वाधिक क्षेत्र हे विदर्भ-मराठवाड्यात आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात या भागामध्ये हळदीची लागवड केली जाते. त्यानंतर मार्च महिन्यापासून काढणीचा हंगाम सुरू होतो. उन्हाळ्यात हळदीला पाण्याची गरज राहत नाही.(halad bajar bhav news)

हळदीच्या दरामध्ये तेजी येण्याचे कारण:(turmeric rate maharashtra)

यावर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस थांबणार असे वाटत होते .परंतु, पावसाची सतत धार या महिन्यामध्ये दिसून आले. याचा परिणाम म्हणजे मातीत ओलावा कायम राहिला. हळदीच्या लागवडीनंतर साडे चार महिन्यात हळदीला मातीचा थर घातला जातो. मात्र यावर्षी हा थर घातल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. त्याचा परिणाम मातीचा थर निघून गेला. त्यामुळे कंद कुंज ,करपा आणि हळदीची फुगवन व्यवस्थित न होणे हे परिणाम दिसून आले.(reasons for high rate prize of turmeric crop)

सरासरी एकूण उत्पादकता घट किती होईल?

हळद तज्ञ डॉ. जितेंद्र कदम यांनी हळदीचे सरासरी उत्पादन 15 ते 20 टक्के घटेल अशी शक्यता सांगितली आहे .उत्पादकता कमी होण्याच्या संकेताने बाजारात हळदीच्या बाजार भावात तेजी दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हळदीचा भावांमध्ये दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. असे डॉ. कदम सांगत होते.

डॉ. कदम यांची प्रतिक्रिया .

हळदीच्या उत्पादनाचा खर्च पहिल्या वर्षी दीड लाखापर्यंत जातो. कारण पहिल्या वर्षी बेणे खरेदी करावी लागते . त्यानंतर मात्र 75 ते 80 हजार रुपयांचा खर्च येतो. दर पाच वर्षांनी बेणे बदलावे लागते. शेतकऱ्यांनी आपापसात जरी बेणे बदल केला तरी उद्देश साध्य होतो यावर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाची संततधार असल्यामुळे जमिनीमध्ये पाणी साचून राहिले पण जी जमीन पाण्याची निचरा करणारी आहे अशा जमिनीमध्ये पावसाचा परिणाम दिसून आला आहे मात्र इतर शेतांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे कंदकूज, करपा आणि हळदीची फूगवन न होणे असे प्रकार घडले आहे. परिणामी उत्पादनामध्ये घट झाली आहे.(haldiche aajche bhav)

हळदी च्या मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या दरामधील तुलना. (Halad bajar bhav update)

वायदे बाजारात हळद आताच सहा हजार रुपये ट्रेंड करत आहे .बाजारात देखील व्यवहार 9000 रुपयांनी होत आहे. त्यामुळे हळद दहा हजाराचा टप्पा गाठून त्यापेक्षाही अधिक तिची दाखवू शकते. हळदीचे (turmeric crop rate increases )गेल्यावर्षी चे भाव म्हणजे 5000 ते 7000 रुपयांपर्यंत होते. यावर्षी त्याच भावा मध्ये तेजी येऊन 7500 ते 9200 रू. पर्यंत पोहोचले आहे .काही दिवसातच हे भाव 10000 रू. च्या पारचा टप्पा गाठेल का अशी उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये लागलेली आहे.(turmeric crop bajar bhav update)

Share via
Copy link