साप्ताहिक हवामान अंदाज व कृषी सल्ला 3 ते 8 मे 2021

बुधवार (ता. ५ मेपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेस १००६ हेप्टापास्कल, तर मध्यावर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा राहील. हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर ढग जमा होतील. त्यामुळे पावसाची शक्‍यता निर्माण होईल.

आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या मतानुसार, प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान उणे ०.९ अंश सेल्सिअस असून, जून महिन्यापर्यंत ते उणे ०.५ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे ला निनाचा परिणाम आणि प्रभाव दिसून येईल. त्याशिवाय भारतीय उपखंडात होणारे हवामान बदल आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात, तसेच दक्षिण भारतात मॉन्सूनपूर्व पाऊस होण्यास अनुकूल ठरतील. अशीच स्थिती जूनपर्यंत व त्यापुढेही कायम राहिल्यास या वर्षीचा मॉन्सून वेळेवर किंवा वेळेपूर्वी दाखल होणे शक्‍य आहे. या वर्षी मॉन्सूनचा पाऊस चांगला होण्यास हवामान घटक अनुकूल राहतील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून असल्याने पावसासाठी ती अनुकूल आहे.

कोकण  
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. कोकणात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रायगड व ठाणे जिल्ह्यात ५० ते ५७ टक्के, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ६७ ते ७९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ कि.मी. राहील. रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ५ मि.मी. पावसाची शक्‍यता असून, वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र  
कमाल तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस, नंदूरबार जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व नाशिक जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस, तर नंदूरबार, जळगाव जिल्ह्यात २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २५ ते ३२ टक्के, तर नाशिक, धुळे जिल्ह्यांत ३४ ते ३८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

मराठवाडा 
उस्मानाबाद, लातूर, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यात ते ४४ अंश सेल्सिअस, तर परभणी व जालना जिल्ह्यांत ते ४३ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान या आठवड्यात अधिक राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांत ३५ ते ३८ टक्के, तर लातूर, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ४१ ते ४७ टक्के राहील. नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत ती ५३ ते ५४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते १४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी ९ ते १७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत ५ ते १५ मि.मी. पावसाची
शक्‍यता राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  
कमाल तापमान कोल्हापूर व नगर जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, तर सातारा जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. पुणे, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ते ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सांगली व सोलापूर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ७३ टक्के, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ३२ ते ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत ५ ते ७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे.

पश्‍चिम विदर्भ 
बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस राहील. तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ते ४३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २८ ते ४० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १४ टक्के राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत ४ ते ६ मि.मी. पावसाची शक्‍यता राहील.

मध्य विदर्भ 
कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस, तर वर्धा, नागपूर जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वर्धा, नागपूर जिल्ह्यात ३९ ते ४३ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यात ५१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १७ किलोमीटर राहील. या आठवड्यात ५ ते ७ मि.मी. पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पूर्व विदर्भ  
गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात ते ४२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ४१ टक्के तर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत ५० ते ५२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १४ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते १२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. या आठवड्यात ५ ते १४ मि.मी. पावसाची शक्‍यता राहील.

कृषी सल्ला 

  • कांदा पिकाची काढणी सकाळच्या वेळी करावी. कांद्याची सुरक्षित ठिकाणी कांदाचाळीत साठवण करावी.
  • आंब्याच्या लहान झाडांना काठीचा आधार द्यावा. जेणेकरून जोराच्या वाऱ्यामुळे झाड हलणार नाही आणि आंबा फळे झडून पडणार नाहीत.
  • नवीन लागवड केलेल्या फळाबागांच्या कलमी रोपांचे उन्हापासून संरक्षण करावे.

– (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ  व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया.)

News Item ID:
820-news_story-1619954800-awsecm-420
Mobile Device Headline:
ढगाळ हवामानासह पावसाची शक्‍यता
Appearance Status Tags:
Section News
weekly weatherweekly weather
Mobile Body:

English Headline:
agricultural news in marathi weekly weather by Dr. ramchadra sabale
Author Type:
External Author
डॉ. रामचंद्र साबळे

आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.

ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Comment