Weather Alert! महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट; हवामान अंदाज व बातम्या 24, 25 व 26 एप्रिल 2021

पुणे, 23 एप्रिल: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान (Weather Update in Maharashtra हवामान अंदाज ) काहीसं अस्थिर झालं आहे. राज्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा वाढत आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग दाटत आहेत. ऐन एप्रिलमध्ये अशा प्रकारच्या वातावरणामुळे शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण होतं आहे. असं असताना आज दुपारी चंद्रपूरला मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं झोडपलं आहे. आज सकाळपासून चंद्रपूरकरांना असह्य उकाड्याचा त्रास होतं होता. त्यानंतर आज दुपारी चंद्रपूरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं लावली हजेरी लावली आहे. राज्यातील तापमान वाढीस लागल्यानंतर या जोरदार पावसामुळं चंद्रपुरात काहीसं आल्हाददायक वातावरण तयार झालं आह

आजचा हवामानाचा अंदाज (Weather Update in Maharashtra हवामान अंदाज

सध्या दक्षिण तमिळनाडू आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रादरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे दक्षिणेकडील बहुतांशी राज्यात अवकाळी पावसाची (Non seasonal Rain) स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उत्तर आणि पूर्वेकडील काही राज्यातही पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे.

राज्यात कोरोना स्थिती प्रमाणे हवामानातही चढउतार नोंदले जात आहेत. एप्रिल महिन्याच्या मध्यावर तापमानाने महाराष्ट्रातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा दिल्यानंतर आता परत राज्यातील तापमानाचा पारा वाढत आहे. असं असताना दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र अवकाळी पावसाचं सावट निर्माण झालं आहे. याठिकाणी तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचे ढग दाटले आहेत. पण याठिकाणी पावसाची शक्यता नाही.

काय असेल पुण्यातील हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१?

मागील चोवीस तासाच पुण्यात 40 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर येथील किमान तापमान हे 19 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदलं गेलं आहे. पुणे, मुंबई, ठाणे, सातारा आणि कोकण पट्ट्यात आकाश नीरभ्र असून कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. असं असलं तरी रात्रीच्या वेळी अंशतः ढगाळ वातावरणामुळे पुण्यातील नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

(हे वाचा-कोरोनाविरोधी लढ्यात भारताला मोठं यश! लशीनंतर औषधही तयार; चाचणीचा एक टप्पा यशस्वी)

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात सध्या कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पण पुढील 2-3 दिवसांत राज्यातील हवामान पुन्हा एकदा उन-पावसाचा खेळ सुरू करू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात. तर पुढच्या तीन दिवसात विदर्भातही अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो

हे पण वाचा :

Leave a Comment

X